वारंवार सरकारकडून होणारी हेल्मेट सक्तीची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे , राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ मध्ये केली होती महाराष्ट्रात परत हेल्मेट सक्तीचे वारे सुरु झाले होते. नो हेल्मेट नो पेट्रोल सारखा नियम लागू करण्यात येणार होता. मात्र पेट्रोलपंप चालकांच्या संपाच्या भितीमुळे सरकारने हा निर्णय आज मागे घेतला. आणि या प्रश्नाला वेगळी दिशा मिळाली. हेल्मेट परिधान न करता वाहन चालविल्यामुळे आत्तापर्यंत लाखो वाहन चालकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.आपल्या जीवाची काळजी प्रत्येका व्यक्तिला असलीच पाहिजे. त्यामुळे हेल्मेट हे अत्यावश्यक आहे.कारण आपला जीव केवळ आपल्यासाठी नाही तर आपल्या परिवारासाठी जास्त महत्वाचा आहे. आपल्या जीवाची किंमत कधीही आपल्या पेक्षा ज्यांचे आपल्यावर प्रेम आहे त्यांना जास्त असते. त्यांचे जगणे आपल्यावर अवलंबून असते. मग ते आपले आई वडील असू देत, नवरा बायको, मुलं असू देत नाहीतर इतर कोणी. मात्र यामुळे ज्यांचा जीव आपल्यावर अवलंबून आहे त्यांच्या साठी तरी किमान आपली काळजी घेतली पाहिजे.पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली असूनदेखील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी हेल्मेट परिधान न करता दुचाकी वाहने चालविताना दिसतात.
याविषयी साप्ताहिक क्राईम डायरीचे संपादक बाबासो जाधव यांनी आपले असे मत व्यक्त केले आहे कि वाहन चालवताना सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. त्यात कोठेही तडजोड होऊ शकत नाही. दुचाकीवरून जाताना वाहन घसरून पडणे वा अन्य प्रकारचा अपघात झाल्यास डोक्याला मार लागून प्राण गमवावे लागल्याच्या घटना कमी नाहीत. अशा घटनांमध्ये डोक्याला गंभीर मार लागून शस्त्रक्रिया कराव्या लागल्याची, अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत उपचारांचा खर्च मोठा असतो. यावरून हेल्मेटचे महत्त्व लक्षात येते. अशा रीतीने हेल्मेटशिवाय वाहन चालवणे धोक्याचे असल्याने त्याबाबत सक्तीचे धोरण राबवण्याचा प्रकार अन्य देशांमध्येही पहायला मिळतो.

No comments:
Post a Comment