कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील अत्यंत चुरशीच्या व नाट्यपूर्ण निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. संदीप नेजदार तर भाजपकडून आशिष ढवळे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते काँग्रेस-राष्ट्रवादीतील रिना कांबळे या विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या गोटामध्ये गेल्या होत्या , निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी , शिवसेना आठ , तर भाजप-ताराराणी आघाडी सात असे मतदान झाल्याने आमदार सतेज पाटील समर्थक व काँग्रेसचे उमेदवार डॉ. संदीप नेजदार यांचा १ मताने विजय झाला आणि त्यांची स्थायी समिती सभापतिपदी निवड झाली , त्यांच्या निवडीमुळे आमदार सतेज पाटील गट आणि काँग्रेस मध्ये जल्लोषाचे वातावरण आहे
No comments:
Post a Comment