आरटीओ ऑफिसमध्ये ग्राहकांना नवीन लायसन्स बनवणे , वाहन नोंदणी करणे , वाहन हस्तांतरण करणे इत्यादी कामी मिळणाऱ्या कॉम्प्युटर प्रिंटमध्ये स्पेलिंगच्या चुका आढळून येत आहेत लिपिकांच्या गलथान कारभारामुळे आधार कार्ड ,मतदान कार्ड किंवा नाव व पत्त्याचा इतर कागदपत्र पुरावा स्पष्ट जोडला असूनही आरटीओ ऑफिसकडून मिळणाऱ्या कॉम्प्युटर प्रिंटमध्ये नावांच्या व पत्त्यांच्या स्पेलिंगमध्ये अक्षम्य चुका आढळत आहेत , त्यामुळे ग्राहकांना सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडूनही विनाकारण मनस्ताप व भुर्दंड सोसावा लागत आहे असाच एक किस्सा नुकताच घडला एका प्रतिष्ठित व्यक्तीला निव्वळ लायसन्समधील स्पेलिंगमध्ये चूक असल्याने पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवताना अडचण आली तर एकाला व्हिसा मिळाला नाही . प्रत्येक ठिकाणी आरटीओ तर्फे मिळालेल्या प्रतीमध्ये व इतर ओळखपत्रामध्ये काही ना काही स्पेलिंग चुका आढळून येत आहेत . आरटीओ ऑफिसमध्ये अधिकारी वर्गाने यात त्वरित लक्ष्य घालून लिपिकांना टायपिंग सुधारण्यास सांगावे नाहीतर अशा ढिसाळ कर्मचाऱ्यांकडून हे महत्वाचे काम तरी काढून घ्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे
No comments:
Post a Comment