बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे राज्यभर पसरले आहे. प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती करणे कायद्याने बंधनकारक आहे;हा पॅथॉलॉजिस्ट एम डी वा त्याहून अधिक पात्रतेचा असावा अशी कायदेशीर तरतूद आहे पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केवळ डिप्लोमाधारक टेक्निशियनची नियुक्ती करून पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. कोणत्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियनने सहायकाचे काम करणे कायद्याने बंधनकारक आहे; पण अनेक लॅबमध्ये टेक्निशियनच वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल तयार करून त्यावर एम डी पॅथॉलॉजिस्टच्या सह्या घेतात.
पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड , युरीन , स्पुटम इत्यादींचे नमुने घेतले जातात ., काही ठिकाणी डॉक्टरांच्या स्वतःच्या अनधिकृत लॅब आहेत यात फक्त डीएमएलटी किंवा इतर अर्हताधारक व्यक्ती पगारावर नेमून त्यान्च्याकडून हे नमुना तपासणीचे काम करून घेतले जाते याच कारणावरून एका डॉक्टरने प्रमाणित केलेल्या चाचण्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यास परत करण्यास सांगितले जाते कारण एका डॉक्टरचा दुसऱ्यावर विश्वास नसतो मात्र यात विनाकारण रुग्ण भरडला जातो
तसेच कमिशनसाठी विनाकारण चाचणी करायला हा प्रकार आता भलताच वाढीला लागला आहे यात डॉक्टरांना भरघोस कमिशन मिळत असल्याने अनेक डॉक्टर पेशंटला तपासण्याआधीच अमुक अमुक चाचणी करणे गरजेचे आहे , उगाच रिस्क नको अशी भीती घालतात
वैद्यकीय सेवेचे व्यवसायीकरण झाल्याची ओरड सुरू असताना बोगस पॅथॉलॉजी लॅबचालकहि आता यात सामील झाले आहेत खरी वैद्यकीय सेवा लोप पावत आहे हि शोकांतिका आहे

Satyamev jayate
ReplyDelete