कसबा बावडा-विद्यार्थ्यांनी आपणास ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात जास्तीत जास्त रस घेऊन आपल्या कलागुणांचा विकास केला पाहिजे.आवडीच्या क्षेत्रात आपले करियर घडवावे व आपले , पालकांचे , शाळेचे ,राज्याचे व देशाचे नाव उंचवावे, आजच्या युगात कलागुणांचा विकास हेच खरे शिक्षण आहे,असे प्रतिपादन शहाजी कॉलेजचे मा. प्रा. एच.एस.वनमोरे यांनी मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ २०१६-१७ च्या उदघाटन प्रसंगी केले.
बहुचर्चित व बहूप्रतिक्षीत असे राजर्षी शाहू विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन दि २७/०३/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता मोठया उत्साहात व जल्लोषात पार पडले.यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सौ. माधुरी लाड ,शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. विजय माळी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अस्लम पठाण व सदस्य , मुख्याध्यापक श्री अजितकुमार पाटील , सर्व पालक , विद्यार्थी , भागातील विविध सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विविध कलागुण दर्शन, पारंपारीक नृत्य , कोळी नृत्य, शेतकरी नृत्य , सामाजिक ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारे कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवशंभू गाटे व श्रीमती आसमा तांबोळी यांनी केले.याप्रसंगी शाळेचा शैक्षणिक विडिओ श्री सुशील जाधव यांनी दाखवला.कार्यक्रमाचे आभार श्री उत्तम कुंभार यांनी मानले.याप्रसंगी कु सुजाता आवटी, सौ प्राजक्ता कुलकर्णी, कु.जयश्री सपाटे, श्री अरुण सूनगार , सौ मंगल मोरे, श्री हेमंतकुमार पाटोळे यांचे सहकार्य लाभले...
Thursday, 30 March 2017
कलागुणांचा विकास हेच खरे शिक्षण - उपप्राचार्य एच.एस.वनमोरे,शहाजी कॉलेज
Monday, 27 March 2017
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकर्याला बेदम मारहाण , शेतकर्यांनी दाद तरी मागायची कुणाकडे?
By - Dnyanraj Patil, Kolhapur
'राजाने मारले आणि पावसाने झोडपले' तर बळी राजाची झाली आहे. एकीकडे सरकार कर्ज माफी ची काही दाद लागू देत नाही आणि दुसरीकडे दुष्काळ यामुळे शेतकर्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.
गारपीटीच्या नैसर्गिक आपत्तीत भुसारे या शेतकऱ्याचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गावातील अन्य शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली. पण, आपल्याला ती अद्याप मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी त्यांनी गेली दोन वर्षे सरकारी कार्यालयाकडे वारंवार केल्या होत्या. पण, त्यांची कुणीच दाद घेतली नाही. शेवटी मायबाप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडण्यासाठी ते मुंबईच्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर थांबले असता,
झाली नाही. ते वारंवार भेटीसाठी फडणवीस यांच्या कार्यालयात सोडा, अशी विनंती करीत होते. पण, त्यांची दया कुणालाही आली नाही. संध्याकाळी सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: भुसारे यांना मानगुटीला धरून बेदम मारहाण करीत मंत्रालयाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . या मारहाणीने ते रक्तबंबाळ झाले. त्यांचे तोंड फुटले. यानंतर
सुरक्षा रक्षकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवून काढले. त्याला मारहाण करीत फरफटत मंत्रालयाबाहेर आणले.
भुसारे यांना मारहाण झाल्यावर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करायच्या ऐवजी, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातील एका खोलीत डांबून ठेवल्याचेही पत्रकारांनी धाव घेतल्याने समजले.
पत्रकारांनी भुसारे कुठे आहेत, अशी विचारणा केली तेव्हा, त्यांना न्यायालयात नेल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यातच ते सापडले असता त्यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो काढायला मनाई केली.
नापिकी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील 20 हजारांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र अद्यापही थांबलेले नाही.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकर्यांना अशी बेदम मारहाण होत असेल तर, शेतकर्यांनी दाद तरी मागायची कुणाकडे?
सहाय्यक राज्य आयुक्त (स्काऊट) ,कोल्हापूर विभाग या पदावर शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांची निवड
. हेरले/ प्रतिनिधी
दि. २७/३/१७
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस राज्य संस्थेच्या सहाय्यक राज्य आयुक्त (स्काऊट) ,कोल्हापूर विभाग या पदावर शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी यांची निवड झाली आहे.त्यांना राज्य मुख्य आयुक्त भा.ई.नगराळे यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे.
शिक्षण उपसंचालक एम. के.गोंधळी यांनी कोल्हापूर विभागामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पदावरती निवड करण्यात आली आहे. सहाय्यक राज्य आयुक्त हे पद राज्यसंस्थेच्या कामकाजातील अत्यंत महत्वाचे पद असून कोल्हापूर विभागातील स्काऊटस आणि गाईडस या चळवळीचा गुणात्मक तसेच संख्यात्मक विकास होण्यास शिक्षण उपसंचासक एम.के. गोंधळी आपल्या प्रदीर्ध अनुभवाच्या जोरावर आणि जिद्द व प्रामाणिक कामाची हातोटी यातून ही चळवळ पूढे नेतील.
यावेळी दैनिकांशी बोलताना शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी म्हणाले, स्काऊटस आणि गाईडस ही जागतिक चळवळ आहे.या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मुल्यसंवर्धनाचं मोठ काम देशातील व राज्यातील शाळांमध्ये सुरू आहे.त्यास अधिक गती देवून गुणात्मक व संख्यात्मक प्रगती करण्यासाठी मी कटीबध्द आहे.या पदापूळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.त्यासाठी मी क्रियाशील आहे.
Sunday, 26 March 2017
टोलमधील पारदर्शकता
By Dnyanraj Patil, Kolhapur
मुंबई-पुणे द्रुतगती आणि पुणे-कोल्हापूर यासह राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीसाठी ठेकेदाराशी झालेल्या एकतर्फी आणि जनतेची लुबाडणूक करणार्या कराराबाबत याआधीही उच्च न्यायालयापर्यंत स्वयंसेवी संस्थांनी धाव घेतली होती.
करार करतानाच अपेक्षित वाहनांची संख्या जाणूनबुजून आणि ठरवून कमी धरण्यात आली, या ग्राहक संघटनांच्या आरोपात सत्य असल्याचेही सिद्ध झाले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
रस्ते बांधायसाठी आलेल्या खर्चापेक्षाही अधिक टोल वसूल करूनही सरकारने ते टोलनाके बंद केले नाहीत. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने राज्यातले टोलनाके सत्ता मिळाल्यास बंद करायचे आश्वासन दिले होते.
महाराष्ट्रातले राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरचे सर्वच टोलनाके पूर्णपणे बंद व्हावेत, ही जनतेची मागणी धुडकावत सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलच्या दरात 18 टक्क्यांची वाढ करून, लोकांच्या लूटमारीच्या या टोलधाडीच्या धंद्याला पुन्हा अभय द्यावे, ही संतापजनक बाब होय.
टोल वसुलीचे लक्ष्य पूर्ण झाल्यास टोल बंद करायची अट त्या करारात असतानाही सरकार मात्र त्या अटीचे पालन करायला तयार नाही. रस्त्याचा बांधकाम खर्च वसूल झाल्यावरही पुन्हा दरवर्षी शेकडो कोटी रुपयांचा तोबरा ठेकेदाराच्या घशात आणि तोही जनतेला दावणीला बांधून कशासाठी घालायचा, याचे उत्तर काही सरकार द्यायला तयार नाही.
कर्नाटक राज्यात राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक महाराष्ट्रापेक्षा कमी असताना, तिथे टोल कमी आणि महाराष्ट्रात मात्र तो दुप्पट का याचे उत्तर काही सरकारने दिलेले नाही.
सरकारची हीच का पारदर्शकता असे म्हणण्याची जनतेवर वेळ आली आहे.
एड्स रोग प्रतिबंधातून शून्यावर आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथकाचे विविध माध्यमातून औदयोगिक वसाहतीत सुरु.
एमएसएम,डीडी, कोती, पणती,या सारख्या घटकामुळे औद्योगिक वसाहतीतील स्थंलातरीत कामगार,ट्रक चालक,वेठबिगार,हॉटेल कामगार या समस्येच्या आहारी जाऊन धोका पतकरत आहेत.दारू,व्यसन,गांज्या,सिगरेट या चैनीसारख्या व्यसनामुळे सेक्स सारख्या प्रकाराकडे आकर्षित होऊन एचआयव्ही व गुप्तरोगाच्या जाळ्यात अडकले जात आहेत.
एम्पलायर लीड मॉडेल प्रकल्प कंपनी त राबविल्यास याची सर्व कल्पना कामगारांना होईल आणि ते या आजारापासून वाचू शकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे
एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार सी एस आर या महत्वकांक्षी 15 टक्के अनुदानातून सामाजिक बांधिलकी उपक्रम राबवण्याचा हट्ट करत असताना मोठमोठ्या कंपनीमध्ये मात्र कामगारांसाठी कोणताच कार्यक्रम राबवत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे
विटभट्टी,हॉटेल,माथाडी,मजूर,हमाल गंवडी ,बांधकाम,सूत गिरणी,गारमेंट्स,ट्रक डायव्हर,किंनर,फेरीवाले हे कामगार अनेक आजारांना बळी पडत आहेत तर कमी शिक्षण आणि कोणतीही माहिती मिळत नसल्याने रोजदारीवर काम करणारे हे घटक मालकी हक्काच्या जाचामध्ये अडकून आरोग्य जनजागृतीपासून अलिप्त राहत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मोठं मोठ्या कंपनीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत एका एका कंपनी मध्ये एक हजार ते पंधराशे पर्यंत कामगार कामाला आहेत तरीही कंपनी व्यवस्थापन एनजीओ मार्फत सुरु असलेल्या स्थं ला त रीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या कार्यक्रमांना कंपनी मध्ये एंट्रीही देत नाहीत त्यामुळे हे कामगार माहितीपासून दूर जात असल्याने जास्त धोका,कमी धोका,मध्यम धोका या वर्गवारीत अडकून पडले असून सुट्टीच्या दिवशी ते सेक्सुयल ऍक्टिव्हिटीकडे प्रवाहित होत असल्याने एच आय व्ही एड्स व गुप्तरोग याचा धोका वाढत चालला असून याची वेळीच माहिती त्याच्या पर्यंत पोहचली नाहीतर एच आय व्ही च्या विळख्यात कामगार सापडण्याची चिंता व्यक्त केली जात आहे
------रमेश वर्धन, विभागीय कार्यक्रम अधिकारी एम्सँक्स,मुबई
-----मोहन सातपुते
प्रकल्प अधिकारी युवा भरारी
खा.छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते सुधाकर निर्मळेसो यांचा विशेष गौरव सत्कार
कोल्हापूर - प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयातील पत्रकारांचे संघटन करून बलाढय पत्रकारसंघ स्थापन केलेबद्दल खासदार छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळेसो यांचा विशेष गौरव सत्कार स्टार अॅकॅडमीच्या वतीने करण्यात आला. यावेळी स्टार अकॅडमीचे अध्यक्ष दिपक शेटे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सोबत सलीम खतीब व इतर मान्यवर उपस्थित होते.
आता येणार इ पासपोर्ट ! ज्यात असेल इलेक्ट्रॉनिक चिप
BY - DNYANRAJ PATIL
.काँग्रेस सरकारच्या काळातच ई-पासपोर्टची घोषणा करण्यात आली होती पण राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे व सरकारी बाबूंच्या दिरंगाईमुळे अमलात न आलेली जवळपास आठ वर्षांपूर्वीची घोषणा मोदी सरकारने खरी करण्याचे ठरवले आहे.2017 साली ई-पासपोर्ट देण्याचे उद्दिष्ट आहे. ई-पासपोर्टमध्ये स्मार्ट कार्डच्या धर्तीवर एक इलेक्ट्रॉनिक चिप असणार आहे. ई-पासपोर्टमुळे डेटा सुरक्षित राहू शकेल आणि तपासणी करणेही सोपे जाईल.