By - Dnyanraj Patil, Kolhapur
'राजाने मारले आणि पावसाने झोडपले' तर बळी राजाची झाली आहे. एकीकडे सरकार कर्ज माफी ची काही दाद लागू देत नाही आणि दुसरीकडे दुष्काळ यामुळे शेतकर्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.
गारपीटीच्या नैसर्गिक आपत्तीत भुसारे या शेतकऱ्याचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गावातील अन्य शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली. पण, आपल्याला ती अद्याप मिळाली नसल्याच्या अनेक तक्रारी त्यांनी गेली दोन वर्षे सरकारी कार्यालयाकडे वारंवार केल्या होत्या. पण, त्यांची कुणीच दाद घेतली नाही. शेवटी मायबाप सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडण्यासाठी ते मुंबईच्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर थांबले असता,
झाली नाही. ते वारंवार भेटीसाठी फडणवीस यांच्या कार्यालयात सोडा, अशी विनंती करीत होते. पण, त्यांची दया कुणालाही आली नाही. संध्याकाळी सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: भुसारे यांना मानगुटीला धरून बेदम मारहाण करीत मंत्रालयाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला . या मारहाणीने ते रक्तबंबाळ झाले. त्यांचे तोंड फुटले. यानंतर
सुरक्षा रक्षकांनी लाथाबुक्क्यांनी तुडवून काढले. त्याला मारहाण करीत फरफटत मंत्रालयाबाहेर आणले.
भुसारे यांना मारहाण झाल्यावर त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करायच्या ऐवजी, पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातील एका खोलीत डांबून ठेवल्याचेही पत्रकारांनी धाव घेतल्याने समजले.
पत्रकारांनी भुसारे कुठे आहेत, अशी विचारणा केली तेव्हा, त्यांना न्यायालयात नेल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यातच ते सापडले असता त्यांचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो काढायला मनाई केली.
नापिकी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या राज्यातील 20 हजारांवर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्यांच्या आत्महत्यांचे हे सत्र अद्यापही थांबलेले नाही.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकर्यांना अशी बेदम मारहाण होत असेल तर, शेतकर्यांनी दाद तरी मागायची कुणाकडे?
No comments:
Post a Comment