कसबा बावडा-विद्यार्थ्यांनी आपणास ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात जास्तीत जास्त रस घेऊन आपल्या कलागुणांचा विकास केला पाहिजे.आवडीच्या क्षेत्रात आपले करियर घडवावे व आपले , पालकांचे , शाळेचे ,राज्याचे व देशाचे नाव उंचवावे, आजच्या युगात कलागुणांचा विकास हेच खरे शिक्षण आहे,असे प्रतिपादन शहाजी कॉलेजचे मा. प्रा. एच.एस.वनमोरे यांनी मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ कसबा बावडा शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ २०१६-१७ च्या उदघाटन प्रसंगी केले.
बहुचर्चित व बहूप्रतिक्षीत असे राजर्षी शाहू विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन दि २७/०३/२०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता मोठया उत्साहात व जल्लोषात पार पडले.यावेळी प्रभागाच्या नगरसेविका सौ. माधुरी लाड ,शैक्षणिक पर्यवेक्षक श्री. विजय माळी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अस्लम पठाण व सदस्य , मुख्याध्यापक श्री अजितकुमार पाटील , सर्व पालक , विद्यार्थी , भागातील विविध सामाजिक मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात विविध कलागुण दर्शन, पारंपारीक नृत्य , कोळी नृत्य, शेतकरी नृत्य , सामाजिक ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारे कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवशंभू गाटे व श्रीमती आसमा तांबोळी यांनी केले.याप्रसंगी शाळेचा शैक्षणिक विडिओ श्री सुशील जाधव यांनी दाखवला.कार्यक्रमाचे आभार श्री उत्तम कुंभार यांनी मानले.याप्रसंगी कु सुजाता आवटी, सौ प्राजक्ता कुलकर्णी, कु.जयश्री सपाटे, श्री अरुण सूनगार , सौ मंगल मोरे, श्री हेमंतकुमार पाटोळे यांचे सहकार्य लाभले...
▼
No comments:
Post a Comment