Monday, 15 May 2017

जंक फूडची चटक जीवनाला अटक






BY - DNYANRAJ PATIL, KOLHAPUR

मॅगी, बर्गर, पिझ्झा, पास्ता, हे पाश्‍चात्य पदार्थ चवीला चटकदार असल्याने, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतही हे पदार्थ खाण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांचे फाजील लाड तर करतातच, पण त्यांच्या हट्टासाठी असे चटकदार पदार्थ उपहारगृहात आपल्या मुलांना नेऊन खाऊही घालतात. या बरोबरीने हल्ली चायनीज ,मंचुरियन ,चिकन ६५ असे आरोग्यास घटक पदार्थही लोकांना चटक लावत आहेत ,एक वेळ घरची भाजी भाकरी खाणार नाही पण नुसत्या चायनीज राईस व नूडल्स वर दिवस काढणारे पुष्कळ आहेत .
          पिझ्झा, बर्गर आणि साखर, मैदायुक्त बेकरी पदार्थांच्या अतिखाण्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढते आहे आणि असे पदार्थ खाण्याने  आरोग्यही बिघडत असल्याने,  सर्वांनीच या महत्त्वाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा आणि  आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा घातक पदार्थांपासून स्वतःला  दूर ठेवावे.
                  देशात पाश्‍चात्य चंगळवादी संस्कृती रुजली आणि फोफावली. पाश्‍चात्य खाद्य पदार्थांची चटक शहरी-ग्रामीण भागातील लोकांना लागली. ज्यादा मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ असलेल्या या कमी पोषण मूल्यांच्या पाश्‍चात्य पदार्थांमुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकारांसह अनेक विकार बळावत असल्याचा इशारा यापूर्वी देशातील वैद्यकीय आणि आरोग्य तज्ञांनी वारंवार दिला आहे. नुकताच मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक आणि विविध आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या ‘जंक फूड’वर शाळांच्या उपहारगृहात बंदी आणण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय लोक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच आहे.

MH9 LIVE NEWS आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा .

No comments:

Post a Comment