शरीरावर वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढण्याची आजकालच्या तरुणाईची फॅशन झाली आहे. टॅटू काढणे म्हणजे आपण किती फॉरवर्ड आहोत हे दाखवण्याचे लक्षण मानले जात आहे , पूर्वी गोंदण काढले जायचे पण त्यासाठी लागणारे रंग हे नैसर्गिक पदार्थांपासून तयार केले जायचे या बाबतीत वैदू लोकांची खासियत असायची पण आता याला पूर्ण व्यावसायिक रूप आले असून टॅटू आकर्षक व टिकाऊ होण्याकरिता अत्यंत तीव्र अश्या कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर हमखास केला जातो यावेळी त्वचेच्या आरोग्याची काळजी बिलकुल घेतली जात नाही .
नुकताच टॅटूमुळे त्वचेचा जंतूसंसर्ग झाल्याने जीवावर बेतण्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे पासुदा नावाच्या तरुणीने गळ्यावर फुलांचा मोठा टॅटू काढला होता रासायनिक केमिकलचा वापर करून टॅटू काढण्यात येतो. मात्र टॅटू काढल्यावर त्यात जंतूसंसर्ग झाल्याने पासुदाच्या गळ्यावर गंभीर जखम झाली आणि कालांतराने तेथे पांढरा चट्टा पडल्याचे दिसून आले.या तरुणीने काही फोटो इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. त्यात गळ्यावरील लाल जखम आणि त्यानंतर पडलेला पांढरा चट्टा स्पष्ट दिसत आहे.
तेंव्हा येथून पुढे टॅटू काढताना सावधान !
No comments:
Post a Comment