कसबा बावडा दि.१५:
आज राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर आज रोजी राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात पार पडला.आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण भारतवीर मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री.अभिजीत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी त्यांनी मुलांना शुभसंदेश देताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून देशाची सेवा करावी असा संदेश दिला.
सदर शुभ प्रसंगी भागाचे लाडके नगरसेवक अशोक जाधवसाहेब,सामाजिक कार्यकर्ते पाखालीसाहेब, त्यांच्या मातोश्री मुमताज पाखाली, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.अजितकुमार पाटील सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य सुतार साहेब,कोरवी मॅडम,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, जयश्री सपाटे , सुजाता आवटी , सुशील जाधव, प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी , बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,प्रभावळे मॅडम, सेवक हेमंत पाटोळे ,मंगल मोरे तसेच भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेच्या वतीने विशेष सामाजिक उपक्रमाअंतर्गत राबविणेत येत असलेल्या "स्वाईन फ्लू -जनजागृती पथनाट्य" या उपक्रमाचे उपस्थितांनी अभिनंदन करून महापौर यांच्यासमोर सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनानिमित्त चिन्मय पोवार, समर्थ कांबळे,श्रुती चौगुले,मयुरी कांबळे आदी मुलांनी भाषणे केली.कार्यक्रमाचे सुत्रांचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर अरुण सुनगार यांनी आभार मानले.आजच्या मंगलप्रसंगी मुलांना गोड खाऊचे वाटप करणेत आले.
Thanks
ReplyDelete