Monday, 4 September 2017

डॉल्बी च्या नादात पंचगंगा प्रदूषणाचा व मुर्ती विटंबनेचा सर्वांना सोयिस्करपणे विसर

कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार

गणपती बाप्पा आगमन झाल्या पासून कोल्हापूर मध्ये एकच चर्चा चालू आहे,

गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लागणार का नाही पण डॉल्बी विरोधात व डॉल्बी समर्थनार्थ जे राजकीय पक्ष व नेते पुढे येत आहेत त्यांनी याबद्दल जरा विचार करावा

कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जनाच्या नंतर पंचगंगा नदी प्रदूषण व भक्ती भावाने पुजलेल्या मूर्तींची विसर्जन करताना विटबंना होत आहे यावर आपले उपाय जरा सुचवा.भक्तीभावाने पूजलेल्या गणरायाच्या अश्या स्थितीला जबाबदार कोण....

नदीमध्ये विसर्जन केले तर प्रदूषण होते म्हणून स्वयंसेवकांकडून मुर्ती दानाचे आवाहन होते पण नंतर त्या दान म्हणून स्वीकारलेल्या मूर्तींची विटंबना होते त्याचा सर्वांना सोयिस्करपणे विसर पडतो

शाडूची मूर्ती असली असती तर हे चित्र दिसले असते का?
आपल्या विचारामुळे परिवर्तन घडू शकेल.

No comments:

Post a Comment