केसांचा रंग हा मेलॅनिनवर अवलंबून असतो. रिफीलमधील शाई संपली की ती पांढरी दिसते. त्यामुळे केसातील मेलॅनिन संपले की, केस पांढरे दिसू लागतात. माणसाचे केस महिन्याला ०.५ इंच वाढतात. आपल्या डोक्यावर साधारण एक ते दीड लाख केस असतात. केसात युमेलॅनिन व (जे केसांना तपकिरी ते काळा रंग देते) दुसरे फॅमेलॅनिन (त्यामुळे केस पिवळसर, लालसर दिसतात) असते. आपण केसांना परस्पर जे रंग लावतो ते चुकीचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय रंगांचा वापर करू नये. काही लोक सहजपणे मेंदीचा वापर करतात. १८९९ पर्यंत केस रंगवण्यासाठी नसíगक पदार्थ वापरले जात असत. फ्रान्सचा रसायनशास्त्रज्ञ युजेन शुलर याने प्रथम १९०९ मध्ये केसांचा रंग तयार केला, त्यात पॅराफेनिलिनडायामाइन वापरलेले होते. नंतर फ्रेंच हार्मलेस डाय कंपनीने तो बाजारात आणला. नंतर लोरियल कंपनीने केसांच्या रंगांची दुनिया बदलून टाकली. काही रंग तर असे आहेत की, बारा वेळा श्ॉम्पू केल्यानंतरही जात नाहीत. हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर यात रंग बसण्यासाठी केला जातो. त्याचे प्रमाण ३० टक्के ठेवावे लागते. अमोनियाचा वापर अल्कलाइन म्हणून केला जातो. हायड्रोजन पेरॉक्साइड व अमोनिया यांच्या मिश्रणामुळे रंग केसाच्या क्युटिकल भागापर्यंत जातो.
No comments:
Post a Comment