Sunday, 10 September 2017

हेरले येथील छत्रपती शिवाजी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक स्थापने पासून तब्बल बावीस वर्षांनी प्रथमच

हेरले/ प्रतिनिधी  दि. १०/९/१७

     हातकणंगले तालूक्यातील हेरले येथील छत्रपती शिवाजी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक स्थापने पासून तब्बल बावीस वर्षांनी प्रथमच होत असून कामधेनू समुह नेते सत्ताधारी आदगोंडा पाटील व माजी सभापती राजेश पाटील यांच्या आघाडीत काटा लढत होत आहे. या निवडणूकीने राजकिय वातावरण तापले असून ग्रामपंचायत निवडणूक या दोन गटनेत्यांमध्ये होणार असल्याने ही रंगीत तालीम समजली जात आहे .
       १९९५ मध्ये कै.बाळासाहेब कोळेकर यांनी या सोसायटीची स्थापना केली होती.१९९६मध्ये त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यू झाला. २००२पर्यंत विदय मान संचालकांनी कार्यभार पाहिला मात्र त्यांच्याकडून अपेक्षित यशस्वी कारभार चालेना म्हणून कामधेनू समूह गटनेते आदगोंडा पाटील यांच्या सहकार समुहात या संस्थेस तत्कालीन संचालकांनी समाविष्ट करण्यात केले. गेली पंधरा वर्षे बिनविरोध कारभार सुरू होता. आदगोंड पाटील व सभापती राजेश पाटील यांच्यात तीन वर्षापूर्वीपासून वितूष्ट आल्याने या संस्थेची निवडणूक लागली असून दोघांकडूनही विजयाची हामी दिली जात आहे .
     सत्ताधारी श्री छत्रपती शिवाजी स्वाभिमानी विकास पॅनेलचे नेतृत्व आदगोंडा पाटील, बाबासाहेब खांबे, झाकीर देसाई, बाबासो चौगुले करीत आहेत. (कर्जदार सर्व साधारण प्रतिनिधी )उमेदवार अस्लम रहिमान खतीब, महावीर बाळासो चौगुले, अर्जुन कृष्णात पाटील, आदगोंडा बाबगोंडा पाटील, प्रकाश बाबगोंडा पाटील, महावीर देवगोंडा पाटील, संजय अप्पासो पाटील, भरतकुमार भिमराव मिरजे, (अनुसुचित जाती जमाती)कृष्णात शामराव कटकोळे (भटक्या विमुक्त जाती) प्रविण बाबासो भानुसे, (इतर मागासवर्गिय) सतिश संभाजी काशिद, (महिला प्रतिनिधी) पद्मावती आण्णासो पाटील, माणिक भुजगोंडा पाटील आदी तेरा उमेदवार उभे असून यांचे विमान चिन्ह आहे. या पॅनेलमध्ये व्हा. चेअरमनसह विदयमान ९ संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
      श्री छत्रपती शिवाजी स्वाभिमानी आघाडीचे नेतृत्व माजी सभापती राजेश पाटील, सरपंच बालेचाँद जमादार, प्रा.राजगोंड पाटील, विलासराव नाईक आदीजण करीत आहेत.यांच्याकडून उमेदवार (कर्जदार सर्व साधारण प्रतिनिधी) सुनिल आण्णासो खोचगे, उदय भूपाल चौगुले, नितीन बाळासो चौगुले, पांडुरंग दादू चौगले, माजी सभापती राजेश           शांतगोंडा पाटील, शशिकांत आदगोंडा पाटील, कपिल नामदेव भोसले, अस्लम बाबू मगदूम,           ( अनु. जाती जमाती) राजेंद्र शामराव कदम, (भटक्या विमुक्त जाती) स्वप्नील बाळासो कोळेकर,
  ( इतर मागासवर्गिय) अशोक बाळासो मुंडे            ( महिला प्रतिनिधी ) श्रीमती शांतादेवी बाळासो कोळेकर, रोहिणी रमेश पाटील आदीजण निवडणूक लढवत आहेत. या आघाडीत विदयमान चेअरमन व संचालिका असे दोघे आहेत. यांचे चिन्ह शिट्टी आहे.
        या संस्थेचे ४१४ मतदान असून १३संचालकां- साठी निवडणूक होत आहे.प्राथमिक शाळा हेरले येथे रविवार१७ सप्टेबंर २०१७ रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान होईल व तात्काळ मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे..

No comments:

Post a Comment