हेरले/ प्रतिनिधी दि.२/१०/१७
राजर्षि छञपती शाहू महाराज यांच्या विशाल कल्पकतेमुळे कोल्हापूर जिल्हा देशात अग्रेसर आहे . असे गौरद्वगार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी काढले. ते शिरोली औद्योगिक वसाहतीतील एस.बी. रिसेलर्स कंपनीचे मालक मोहनराव शिरगावकर यांच्या १९ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते .कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन शिरगावकर , सुधिर शिरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , राजर्षि शाहू महाराज यांनी आपल्या कल्पकतेमुळे राधानगरी धरण बांधले , कोल्हापूरात रेल्वे सेवा सुरु केली. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेती , उद्योग व व्यापार या तीनही गोष्टींना अत्यंत पोषक व पुरक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे देशात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर बनला आहे.
कंपनी विषयी बोलताना ते म्हणाले , व्यवस्थापण , कर्मचारी व कामगार यांच्यात एक कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत . त्यामुळे कंपनी बरोबर अनेक कुटूंबांची उन्नती झाली आहे. भविष्यातही कामगारांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करावे. असे आवाहन केले.मुलांच्या शिक्षणाबाबत ते म्हणाले , कामगारांनी आपल्या मुलांच्यावर शिक्षण लादू नये. त्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यास सहकार्य करावे .
यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच कंपनीतील गुणवंत कर्मचारी व कायझन स्पर्धेत कंपनीचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कंपनीचे सह. कार्यकारी संचालक सोहन शिरगावकर ,प्रफुल्ल शिरगावकर , राजेंद्र शिरगावकर , एस. आर. कुलकर्णी , सतिश माने यांच्यासह अधिकारी , कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक सचिन शिरगावकर यांनी केले. व आभार सोहन शिरगावकर यांनी मानले.
फोटो - शिरोली औद्योगिक वसाहतीतील एस.बी. रिसेलर्स कंपनीतील कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार , डावीकडून सुधिर शिरगावकर , प्रफुल्ल शिरगावकर , सचिन शिरगावकर , राजेंद्र शिरगावकर , सोहन शिरगावकर , व्ही.एस.रेड्डी आदी.
▼
No comments:
Post a Comment