कोल्हापूर प्रतिनिधी
कसबा बावडा पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. बंधाऱ्यावर मोठे खड्डे पडले आहेत तर पुरातून वाहून आलेले वृक्ष व झाडे बंधाऱ्याच्या मोरीमध्ये धोकादायक रीत्या अडकले आहेत. वडणगे, निगवे, जोतिबा व पंचक्रोशीतील वर्दळ कोल्हापूर ला बावडामार्गे जोडणारा जवळचा मार्ग हा बंधारा फार महत्वाचा आहे.
या खड्ड्यांमुळे या पूर्वी कित्येक अपघात घडले असुन लोकांना प्राणही गमवावे लागले आहेत.
मागिल वर्षीचा सरांचा अकाली अपघाती मृत्यू चटका लावणारा होता. त्यावेळी सर्वत्र श्रद्धांजलीची पोस्टर लावली होती पण ज्या खड्ड्यांमुळे अपघात झाला त्यावर उपाय योजना केली असती तर ती खरी श्रद्धांजली ठरली असती. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ढिम्म आहेत, कदाचित एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट पहात असतील.
No comments:
Post a Comment