कसबा बावडा: प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. कसबा बावडा कोल्हापूर येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. सदर प्रसंगी कोल्हापूर शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री एम. के.गोंधळी साहेब, शिक्षण निरीक्षक श्री डी.एस.पोवार साहेब, प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रशासनाधिकारी श्री विश्वास सुतार साहेब ,मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर ,भारतवीर मित्र मंडळाचे राहुल भोसले,नितीन जाधव,शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई,आदी उपस्थित होते
त्याचवेळी मा.उपसंचालक एम.के. गोंधळीसाहेब यांच्या हस्ते
' कमाल गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी:- शैक्षणिक व्हिजन 2020 ' या माननीय प्रशासनाधिकारी सुतार साहेब यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्दिष्ट फलकाचे तसेच शाहू तरंग वाचनालय यांचे उदघाटन करणेत आले.
सदर प्रसंगी गोंधळी साहेब म्हणाले ," वाचनाबरोबर आपण अवांतर वाचनही केले पाहिजे.आज जीवनशैली बदलत आहे या बदलत्या जीवनशैली बरोबर आपण आपले आरोग्य सांभाळले पाहिजे.शिकाल, वाचाल आणि आरोग्य संभाळाल तर टिकाल ". असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमानंतर मुख्याध्यापक अजितकुमार पाटील लिखित 'महिलासाठी योगासने 'हे पुस्तक मान्यवरांना भेट दिले,त्यानंतर इयत्तावर मुलांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व इतर वाचन घेणेत आले.लहान मुलांच्या वाचन कौशल्याचे कौतुक मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर आभार श्री उत्तम कुंभार यांनी मानले.सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे मॅडम,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर,रमेश सुतार,वैशाली कोरवी,शुभांगी चौगले,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव,जयश्री सपाटे , सुजाता आवटी,अरुण सुनगार, प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी,बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील मॅडम,प्रभावळे, सेवक हेमंत पाटोळे ,मंगल मोरे तसेच भागातील पालक,जेष्ठ नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment