Sunday, 26 November 2017

26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदानाच्या माध्यमातुन आदरांजली !

कसबा बावडा प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील.

प्राथमिक शिक्षण समिती, मनपा कोल्हापूर संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदान च्या माध्यमातुन आदरांजली वाहण्यात आली. वेध फाऊंडेशन व राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र11 कसबा बावडा,कोल्हापूर यांच्या संयुक्तपणे रक्तदान शिबीर घेण्यात आले. नगरसेविका माधुरी लाड यांच्या अध्यक्षतेखाली खाली मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, वेध फाऊंडेशन चे अध्यक्ष रुद्र पाटील, नगरसेवक अशोक जाधव,भारतवीर तरुण मंडळचे अध्यक्ष चेतन चौगले,अभिजीत जाधव,राहुल भोसले भोसले,यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैभवलक्ष्मी ब्लड बैंकेचे डॉ. मछिंद्र सावंत,सागर माळी,रेखा कुरणे,निलेश चौगुले,नीलम देवकर,माया निगडे,भारती लोकूर,अक्षय कारंडे,करणं घोलराखे,श्रुती शिंदे,अपूर्वा भोसले यांनी विशेष सहकार्य केले.     उपस्थितांचे स्वागत मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले श्री.अरुण सुनगार यांनी रक्त व त्याची माहिती सांगितली, शिवशंभू गाटे यांनी आभार मानले.मृणाली दाभाडे,भक्ती चव्हाण,यश घाटगे,जे.बी.सपाटे,सौ.अर्चना कोरवी तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक,भारतवीर तरुण मंडळाचे कार्यकर्ते ,माजी  विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment