Tuesday, 7 November 2017

मौजे वडगांव( ता. हातकणंगले ) येथील विद्या मंदिर मराठी शाळेत विद्यार्थी दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

हेर्ले / वार्ताहर   दि. ८/११/१७
               मौजे वडगांव( ता. हातकणंगले ) येथील विद्या मंदिर मराठी शाळेत विद्यार्थी दिन विविध कार्यक्रमांनी  संपन्न झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेबंर १९०० साली सातारा येथील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस विदयार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत अखंड सप्ताहामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
              पी.के.सामाजीक सेवा ग्रुप यांचे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती सकाळी ११  वाजता निंबध स्पर्धा सुरू करण्यात आली. कार्यक्रम कॉ. प्रकाश कांबरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. स्पर्धेत उत्कृष्ट निंबध लिहणारे विद्यार्थी  व वकृत्त्व स्पर्धात प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी यांना  परिक्षा पॅड, वह्या, पेन आदी साहित्य व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
       यशस्वी विदयार्थी निंबध स्पर्धा मोठा गट :प्रथम कु .गायत्री सकटे,द्वितीय कु.गायत्री अकिवाटे,तृतीय कु.वैष्णवी  चौगुले ,लहान गट प्रथम कु.रहमत बारगीर,द्वितीय  कु .श्रेया कांबळे,तृतीय कु.समर्थ गोरड,वकृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम समृध्दी लोहार ,द्वितीय कु.शामबाला  तराळ,तृतीय कु.श्रेया कांबळे,लहान गट प्रथम कु.वैष्णवी शेडगे, द्विवितीय कु. समीक्षा लंबे,तृतीय कु.भार्गवी कांबळे.आदींनी यश मिळविले
      यावेळी  कॉ. प्रकाश कांबरे, शालेय कमिटी अध्यक्ष संतोष मोरे, सचिन लोहार, पवन जाधव, दिपक लोहार, प्रसन्न कांबरे, शाळेचे मुख्याध्यापक आनंदा पाटील, श्रुती गोखले, शिवाजी पाटील, शिवाजी लोखंडे,अरूणा कोठावळे,
रझिया नदाफ, अविष्कार कांबळे, प्रशांत पाटील,  शिक्षकवृंद उपस्थीत होता. आभार माणिक पाडळकर यांनी मांनले.
          फोटो - मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील विद्यामंदिर मधील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीसह शिक्षकवृंद

No comments:

Post a Comment