Sunday, 31 December 2017

सोशल मीडिया वर "मराठी आहे मराठीच राहणार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार" च्या पोस्ट व्हायरल

ज्ञानराज पाटील

भारतीय लोक उत्सव प्रिय असल्याने ते प्रत्येक उत्सव अगदी मनापासून साजरा करतात... धर्माच्या आणि सीमांच्या मर्यादा त्यांना उत्सव साजरे कारण्यापासून रोखण्यास असमर्थ ठरल्याचे आजवर दिसून आले आहे.
अगदी क्रिकेट मॅच जिंकली तरी दिवाळी एवढ्याच फटाके फोडून आनंद साजरा केला जातो त्यामुळे, नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्याला करायचे कि, १ जानेवारीला.. .हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग.. अर्थात, कोणताही उत्सव साजरा करत असताना एकाद्याचे (पाश्चिमात्य) अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा विचार होणे गरजेचे वाटते.
मुंबईत नुकत्याच झालेल्या घटनेमुळे या पार्टी करणार्या मुलामुलींची काळजी वाटते . ते सर्व सुखरूप घरी पोहोचते व्हावेत असेच सर्व पालकांना वाटते . स्त्रिया व मुलींवर 31 च्या पार्टीत अत्याचार होणे हे तर किळसवाणे आहे.

निव्वळ दारू पिऊन लोड होणे हिच जर 31 डिसेंबर ची व्याख्या होणार असेल तर त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे.
म्हणून सोशल मीडियावर "मराठी आहे मराठीच राहणार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार" अश्या पोस्ट फिरत असतात त्यात वावगे ते  काय  ?

Thursday, 28 December 2017

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनी दिले जाणारे पत्रकार गौरव पुरस्कार जाहिर

पेठवडगांव / प्रतिनिधी दि. २८/१२/१७
मिलींद बारवडे
  मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिनी दिले जाणारे पत्रकार गौरव पुरस्कार जाहिर झाले आहेत.
      कोल्हापूर जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मेडियामध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांच्या उत्कृष्ट व अतुलनीय लेखनाबद्दल पत्रकार संघाकडून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रमाणे सर्वोत्कृष्ट पुरस्कार बी न्युज इलेक्ट्रॉनिक मेडिया महंमद युनुस ऊर्फ ताज अब्दुल मुल्लाणी  (कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट ग्रामिण पुरस्कार प्रिंट मेडिया दैनिक तरुण भारत प्रकाश तुकाराम नाईक (कागल )
सर्वोत्कृष्ट पुरस्कार सिमाभाग विठ्ठल बापू केसरकर   ( निपाणी)
        उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार बारा तालूक्यातील या प्रमाणे आहेत. दगडू श्रीपती माने दैनिक पुण्यनगरी   ( शिरोळ), दयानंद बाबूराव लिपारे दैनिक लोकसत्ता       ( इचलकरंजी), दिलीप बाबूराव पाटील दैनिक तरूण भारत ( पन्हाळा), मोहन गणपती सातपुते दैनिक लोकमत ( करविर),बशिर सिकंदर मुल्ला दैनिक पुण्यनगरी ( आजरा), अशोक तुकाराम पाटील दैनिक सकाळ ( चंदगड), शिवाजी पुंडलिक सावंत दैनिक लोकमत ( भुदरगड) चंद्रकांत बळवंत पाटील दैनिक लोकमत ( गगनबावडा) राजेंद्र गणपती पाटील दैनिक  सकाळ ( राधानगरी), एन.एस. पाटील दैनिक पुढारी(कागल ), दिपक दादासो मांगले दैनिक महाराष्ट्र टाईम्स (गडहिंग्लज ) चंद्रकांत रामचंद्र शेळके दैनिक तरूण भारत ( शाहूवाडी) आदी पत्रकारांना पुरस्कार जाहिर झाले आहेत.
         रविवार दि. ७ जानेवारी २०१८ रोजी कागल येथील बहुउद्देशीय प्रशासकिय हॉलमध्ये पत्रकार दिन निमित्त पत्रकार गौरव पुरस्कार वितरण सोहळा कार्यकमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काडसिध्देश्वर महाराज, प्रमुख पाहुणे माहिती उपसंचालक सतीश लळित, प्रमुख उपस्थिती मराठी पत्रकार परिषद विभागीय सचिव समिर देशपांडे, जिल्हाध्यक्ष संपादक चारूदत्त जोशी, अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
      अशी माहिती शासकिय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी विभागीय सचिव समिर देशपांडे, अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, कौन्सील मेंबर सुरेश कांबरे,प्रा.भास्कर चंदनशिवे, शशिकांत राज, दयानंद लिपारे, दिपक मांगले, भाऊसाहेब सकट,लक्ष्मण कांबरे, प्रशांत तोडकर, सलीम खतीब आदीजण उपस्थित होते.

Sunday, 24 December 2017

हेरले ( ता.हातकणंगले )येथील जिजामाता विद्यालय यांच्या वतीने ग्राहक दिनानिमित्त भरला "चिमुकल्यां चा बाजार"

हेरले / प्रतिनिधी दि. २४/१२/१७

    हेरले ( ता.हातकणंगले )येथील जिजामाता विद्यालय यांच्या वतीने ग्राहक दिनानिमित्त,"चिमुकल्यां चा बाजार" भरविण्यात आला होता. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
       पहिली ते चौथीच्या विदयार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. फळभाज्या, पालेभाज्या, फळे, खाऊचे पदार्थ आदीसह खेळणी यांचे स्टॉल लावले होते. बाजारामध्ये व्यापारी शेतकरी जसे आपले उत्पादने विक्री करतात. त्याप्रमाणे चिमुकल्यांनी विक्री केली. हा बाजार पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.
     उदघाटन जि. प.सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व पो.पाटील नयनताई पाटील यांच्या शुभहस्ते झाले.  या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच विजय भोसले,संस्थापक शरद माने, संस्थेचे अध्यक्ष व ग्रा.पं. सद्स्य राहुल शेटे, सतीश काशीद,विजया घेवारी ,स्वरूपा पाटील, मीनाताई कोळेकर,शोभा खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

          फोटो - हेरले येथील जिजामाता विद्यालयाच्या बालचमूच्या बाजारात खरेदी करतांना जि.प. सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व इतर मान्यवर

वृद्धाश्रमात ब्लैंकेंट व फळे वाटपाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम

हेरले / प्रतिनिधी दि. २१/१२/१७

मौजे मुडशिंगी ( ता. हातकणंगले ) येथील श्री छत्रपती शिवाजीराजे चौक ग्रुप व गजानन जाधव युवा प्रेमी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले.
चोकाक येथील वृध्दाश्रमामध्ये ब्लैंकेंट व फळे वाटप करण्यात आली. बालाजी हायस्कूलमध्ये वही वाटप करण्यात आल्या. गाव तलावावर वृक्षारोपण करण्यात आले.तलाठी कार्यालयास फर्निचर भेट देण्यात आले.बुलेट रेसिंग श्वान स्पर्धा घेण्यात आल्या. ग्रुपचे पदाधिकारी समिर पेंढारी यांचा सत्कार मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सुनिल तेलनाडे, राकेश अगरवाल, बाबासाहेब मंडले, कुंदन आवळे, शितल खोत, सुनिल मोरे , चंद्रकांत माने आदी मान्यवरांसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

        फोटो - मौजे मुडशिंगी येथे समिर पेंढारी यांचा सत्कार करतांना मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव व अन्य मान्यवर

एमसीसी गटपातळी स्पर्धेत हेरले हायस्कूलचा प्रथम क्रमांक

हेर्ले / वार्ताहर दि. १७/१२/१७

हातकणंगले तालूक्यातील मौजे वडगांव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये एमसीसी गटपातळी स्पर्धेत हेरले हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
      हातकणंगले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या मार्फत समन्वयक कुमार पाटील यांनी एमसीसी गटपातळीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत परिसरातील माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक हेरले हायस्कूल हेरले, द्वितीय क्रमांक राष्ट्रसेवा प्रशाला, तृतीय क्रमांक बालावधूत हायस्कूलने पटकाविला. स्पर्धेचे उद्घाटन सरपंच काशिनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षिस वितरण ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे, माजी उपसरपंच शाखाप्रमुख सुरेश कांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.परिक्षक म्हणून अध्यापक नरसोडे, गवंडी, पाटील, कांबळे आदींने केले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. पाटील, क्रीडा विभागप्रमुख संजय चौगुले,शिक्षक वृंद, विदयार्थी उपस्थित होते.

       फोटो - मौजे वडगांव येथील बालावधूत हायस्कूलमध्ये एमसीसी गट पातळी स्पर्धेतील विजेते सहमान्यवर.

Saturday, 23 December 2017

म्यूचुअल फंड म्हणजे काय रे भाऊ ?

ज्ञानराज पाटील.

म्यूचुअल फंड है सही च्या जाहिराती प्रसार माध्यमांतून झळकत आहेत, ज्यांना शेअर बाजार कशाशी खातात हे माहित नसणार्‍यांना म्युच्युअल फंड म्हणजे दूरची गोष्ट आहे. त्यासाठी हा खास लेख !
आवडला तर अवश्य शेअर कराच व मराठी माणसाला अर्थ साक्षर करायला हातभार लावा.

सर्वसामान्यांसाठी शेअर बाजारात स्वत: गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल अॅनेलेसीस व फंडामेंटल अॅनेलेसीस करता येणे गरजेचे असते, त्याचप्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. याव्यतिरिक्त आपण शेअरबाजारात व्यवहार करताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
           अनेक लोकाना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचेकडे पैसेही असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे.

तुम्ही केलेल्या गुंतवणूकीच्या बदल्यात तुम्हाला युनिटस मिळतात .

Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर), गुंतवणूकदार हा या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset Value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअरबाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा वाढते, याउलट जर शेअर बाजार खाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकनसुद्धा कमी होते. हि अशी मूल्यवृद्धी किंवा मूल्य घट शेअरबाजाराच्या काळाप्रमाणे नियमितपणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो.

म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदीच गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी.

डॉ.सायरस पूनावाला’ स्कूलमध्ये 'शेतकरी दिवस’ उत्साहात साजरा.

ज्ञानराज पाटील

पेठ वडगांव येथील  विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल व डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये शेतकरी दिवस 23 डिसेंबर2017 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संभाजी माळी( प्रगतशील शेतकरी), अँड उदय महाजन, सीमा बायोटेक तळसंदेचे व्यवस्थापक  विश्वास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ,स्कूलचे संचालक डॉ. श्री. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील 75 टक्के पेक्षा जास्त लोक शेती करतात. विद्यार्यांना आपल्या
संरकृतीची ओळख व्हावी. भारतीय अर्थव्यवरथेचा ‘कणा' समजला जाणा-या शेतक-याच्या विषयी माहिती मिळावी,
फळभाज्या, पालेभाज्या, अन्नधान्य निर्मिती व पुरक व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी या हेतूने
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व चौधरी चरणसिंग यांच्या फोटो पूजनाने
झाली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचा सौ विद्या पोळे यांच्या हरते शाल, श्रीफळ, पुस्तक व रोपटे देवून सत्कार करण्यात
आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे जीवन, शेती व त्याचे महत्व विशद केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून शेतकरी गीतांचे, नृत्यांचे बहारदार सादरीकरण झाले. यामध्ये शेतकरी त्यांचे परिश्रम, गावाकडील शेती यामधून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर प्रकाशझोत टाकला. संगीत विभागातून विद्यार्थ्यांनी शेतकरी जीवन, शेतकरी दादा, या
सारखी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी हयावर आधारीत ‘शेतकरी नाटक सादर करून विद्यार्थ्यांनी शेतीवरील प्रेम व्यक्त केलेशेतकरी दिना निमित्त शक्ती साळोखे ,  नंदीनी कापरे, , पवित्रा माने, अवंती ढोके, . आर्या पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या भाषणात बोलतांना श्री संभाजी माळी यांनी भारतीय शेतीवर उत्तम विचार व्यक्त केले. शेतीची
अवस्था, पिकातून मिळणारे उत्पन्न तसेच आपण शेतक-यांची मुले आहोत. आपण शेतक-यांचा कसा सन्मान केला पाहिजे, शेतीची मशागत करून अत्याधुनिक शेती कशी केली पाहिजे, शेतक-यांना असणा-या समस्या, त्याचे जीवन,
परंपरागत शेती व आधुनिक शेती या बद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या बरोबरच श्रीमती
विजयादेवी यादव, सौ. विद्या पोळ, डॉ. सरदार जाधव यांनी ही आपले विचार व्यक्त केले. तसेच काही शेतकरी
पालकांनी आपले शेतीबद्दलचे अनुभव व्यक्त केले.
       विद्यार्यांनी आपल्या पालकांनी शेतीमध्ये उत्पादित केलेली कृषी उत्पादने फळभाज्या, पालेभाज्या, विविध धान्य, कडधान्याचे नमुने प्रदर्शित करण्यात आले होते व त्याची माहिती आपल्या मित्रवर्गाला दिली. तसेच शेतकरी कशा प्रकारे उत्पादन घेतो याची माहिती सांगितली. त्याचा विद्यार्थ्यांना खूप लाभ झाला.
     या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या
अध्यक्षा सौ. विद्याताई पोळ, संचालक डॉ. सरदार जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. स्नेहल नार्वेकर, श्री भीमा गोणी, सांस्कृतीक विभाग प्रमुख निता मोरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांनी विशेष
परिश्रम घेतले यावेळी शाळेचे सर्व शिक्षकपालक उल्लेखनीय संख्येने उपस्थित होतेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका सुतार व श्रावणी शारवीद्र यांनी केले. आभार प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांनी मानले.

Tuesday, 12 December 2017

शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये राजर्षी शाहू विद्यामंदीर क्र.११ चे घवघवीत यश

** ज्ञानराज पाटील.

कसबा बावडा  परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या बाल वैज्ञानिकांनी प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरच्या वतीने आयोजित शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०१७ २०१८ मध्ये *तृतीय क्रमांक* पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी ' शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि विज्ञान ' या विषयाअंतर्गत *"पर्यावरणपूरक शाळा (ecofriendly school)"* हे अभूतपूर्व, आदर्श , आकर्षक असे राजर्षी शाहू विद्यालयाचे थर्माकोलचे  मॉडेल  सादर केले.
शाळेचे विद्यार्थी बापू गाढवे व हर्षदीप दाभाडे यांनी मांडलेले
हे आदर्श शाळेचे मॉडेल संपूर्ण विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.विद्यार्थी ,बालवैज्ञानिक, शास्रज्ञ,पालक, भागातील हौशी विज्ञान रसिक,नागरिक सर्वांनी सदर मॉडेलचे व विद्यार्थ्यांच्या कल्पनेचे कौतुक करून पर्यावरणपूरक शाळा ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
सदर मॉडेलमध्ये शाळेची विजेची गरज भागविण्यासाठी शाळेवर सोलर पॅनल,  पोषण आहार शिजवण्यासाठी सौरचुलीचा वापर, शालेय सांडपाण्याचा वापर शालेय बागेसाठी व पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला उत्पादनासाठी केलेचे दाखविण्यात आले होते.
तसेच हात धुण्यासाठी व जेवल्यानंतर चूळ भरण्यासाठी आयुर्वेदिक कडुनिंबाच्या पानाचा व सालीचा वापर, शाळेतील कचरा खरकटे अन्न, ओला कचरा,फळांच्या साली ,उरलेला पोषण आहार या पासून कंपोस्ट खत निर्मिती आदी आधुनिक संकल्पना या मॉडेलमध्ये दाखविणेत आल्या आहेत.
या बाल वैज्ञानिकांना शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर,विज्ञान शिक्षक अरुण सुनगार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी विश्वास सुतार साहेब,नगरसेविका मधुरीताई लाड मॅडम ,शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम, विजय माळी सर,बाळासाहेब कांबळे,शाळा व्यावस्थापण समिती चे अध्यक्ष प्राजक्ता शिंदे, उपाध्यक्ष पल्लवी पाटील, रमेश सुतार,रजनी सुतार वैशाली कोरवी,उत्तम कुंभार,सुशील जाधव,सुजाता आवटी ,जयश्री सपाटे ,प्राजक्ता कुलकर्णी ,आसमा तांबोळी,शिवशंभू गाटे सर आदींनी मुलांचे कौतुक केले.

Monday, 11 December 2017

मराठी पत्रकार परिषदेतर्फे कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कागल /प्रतिनिधी 


मराठी पत्रकार परिषद राज्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक तालुक्यात पोहोचली आहे. संघटनेची जागृती वाढत असून ती सर्व समावेश व   सक्षम बनली आहे. पत्रकारांनी नुसत्या बातम्या देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नासाठी, त्यांच्यावरिल अन्याय दूर करण्यासाठी काम करावे. असे आवाहन करून मराठी पत्रकार परिषद महिला पत्रकारांचेही  स्वतंत्र संघटन करणार आहे. भविष्यात संघटना पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी भक्कम पणे त्यांच्या पाठीशी उभा राहिल.असा विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष एस. एम.देशमुख यांनी व्यक्त केला. 


              मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील  प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत  ते बोलत होते. याप्रसंगी परिषदेचे नूतन अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, कार्याध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाराज, किरण नाईक, विभागीय सचिव समीर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            देशमुख पुढे म्हणाले मराठी पत्रकार परिषदेचे  राज्यातील जिल्हा पत्रकार संघाचे कार्य चांगले आहे. संघटनेने गत वीस वर्षात अनेक पत्रकारांना मदत केली आहे. माझ्या अध्यक्ष पदाच्या काळात एकोणीस प्रश्नांची निर्गत केली आहे. पत्रकारांची ही चळवळ भविष्यात तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे.कोल्हापुरच्या बारा तालुक्यात सुधाकर  निर्मळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांना चांगले बळ दिले आहे. ते आमच्याशी संलग्न झाल्याने ताकद वाढली आहे.

 मराठी पत्रकार परिषद हे एक कुटुंब आहे.सदस्य अडचणीत असल्यास सर्वांनी धावून गेले पाहिजे. सर्वांनी संघटीत होऊन काम करावे .कोण आपली बदनामी करत असेल, टिका करत असेल , त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक काम करत रहावे.कोणीही स्वतःला एकटे समजू नये. संघटना ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. आपली संघटना ताकदीने तुमच्या पाठीशी आहे. आपली संघटना सर्व समावेशक आहे. आपले नियम, तत्वे कोणी स्वीकारत असेल तर त्यांना आपण सामावून घेऊ.आपल्या संघटनेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे. खर्चाचा हिशोब ऑन लाईन देणारी राज्यातील  आणि देशात ऑन लाईन पध्दतीने निवडणूक यशस्वी पणे राबविणारी एकमेव आपली एकमेव संघटना आहे.याची दखल अन्य जिल्ह्य़ानी घ्यावी.

ते म्हणाले भविष्यात संघटना पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविणार आहे. याशिवाय महिला पत्रकारांचेही संघटन करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी परिषद भरीव काम करणार आहे.हे स्पष्ट करून मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या प्रयत्नातून वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या भूमीत त्यांच्या नावाने मोठे स्मारक होत आहे. 6 जानेवारी रोजी होणाऱ्या स्मारकाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नूतन अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा म्हणाले यापूर्वी  मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने केली आहेत.शासनाने याची दखल घेतली आहे.पत्रकार संरक्षण कायदा लवकरच होत आहे. तसेच पत्रकारांना पेन्शन देण्याऐवजी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना सुरू केली जाणार आहे. यास शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात त्याच्या                         

     अंमलबजावणीस मान्यता मिळेल. असा विश्वास व्यक्त करून भविष्यात संघटना पत्रकारांचे प्रश्नासाठी सकारात्मक काम करेल. असे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्याचा व इतर    मान्यवरांचा    

  सत्कार करण्यात आला. तसेच कोल्हापूर डिस्ट्रीक्ट  रीपोर्टर वेल्फेअर असोसिएशन ही संघटना मराठी पत्रकार परिषदेस संलग्न झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे , संचालक नंदकुमार कांबळे, भास्कर चंदनशिवे, कागल तालुका अध्यक्ष नरेंद्र बोते यांचा एस.एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागातील प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

स्वागत व प्रास्ताविक किरण नाईक यांनी केले. बैठकीस मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, विविध जिल्ह्य़ातील पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जय हनुमान सह.दूध संस्थेचे आदर्शवत कार्य

हेर्ले / वार्ताहर दि. ११/१२/१७

हातकणंगले तालूक्यातील  जय हनुमान सह.दूध संस्थेमार्फत विविध योजनेतून दूध उत्पादकांना १ लाख९८ हजार रूपयाचा लाभांश निधी वाटप करण्यात आला.
       जय हनुमानदूध संस्थेकडून सर्वदूध उत्पादक सभासदांची दि ओरियंन्टल इन्सुरन कंपनी मार्फत वार्षिक विमा पॉलिसी उतरविली आहे. मनोहर शिवाप्पा चौगुले यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना १ लाख ८oहजार रुपयांचा धनादेश तसेच याच योजनेतून दूध उत्पादक अनिल गंगाराम भोसले यांना वैरण कापत असतांना हाताला विळा लागूलेने ऑपरेशन केले होते. त्यांना १६ हजार २५४ रुपयांचा मेडिक्लेम, नारायण बाबूराव संकपाळ यांची म्हैस मृत झालेने २ हजार पशु मयत निधी योजनेतून आदी तीन सभासदांना १ लाख ९८ हजार २५४रूपयांचा धनादेश स्वाभिमानी शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, चेअरमन महादेव शिंदे, माजी चेअरमन बाळासाहेब थोरवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
      जय हनुमान दूध संस्थेने म्हैस दूध दर फरक ६रू  व गाई दूध दर फरक २रूपये ९० पैसे इतका  उचांकी हातकणंगले तालूक्यातून दिला आहे. सर्व सभासदांना गोकूळच्या सर्व सेवा तसेच सभासद मयत अनुदान, शालेय विद्यार्थी शिष्यवृत्ती, वृक्षारोपन, लेक वाचवा अभियान, पशुसंवर्धन शिबीरे, आदी सामाजिक उपक्रम राबवित आहे. यामुळे संस्था अत्पावधितच आदर्श दूध संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. सुधाकर निर्मळे, लक्ष्मण कांबरे, सलीम खतीब यांचा सत्कार करण्यात आला.
        याप्रसंगी चेअरमन महादेव शिंदे, व्हा. चेअरमन शकील हजारी, संचालक मंडळ माजी चेअरमन बाळासाहेब थोरवत, माजी उपसरपंच सुरेश कांबरे, जयवंत चौगुले, नेताजी कांबरे, बाळासो चौगुले, निवास शेंडगे, सुनिल सुतार, सागर थोरवत, शिवाजी रजपूत, महादेव चौगुले, प्रकाश पाटील, सुभाष मुसळे, सचिव आण्णासो पाटील, लक्ष्मण चौगुले, विलास घुगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
        फोटो
मौजे वडगाव  जय हनुमान दूध संस्थेमध्ये लाभाशांना धनादेश प्रदान करतांना सुधाकर निर्मळे व इतर मान्यवर

Sunday, 10 December 2017

बिट कॉईनचा भूलभुलैया

कोल्हापूर - ज्ञानराज पाटील,

तुम्हाला Whats app किंवा अन्य मार्गाने बिटकॉईनबाबत किंवा इतर कॉईन ट्रेडिंग करणाऱ्या ग्रुप कडून अथवा इतर कोणाकडूनही अमुक अमुक कॉईन मध्ये गुंतवणूक करण्याबद्दल सांगितले तर गुंतवणुकीच्या आधी इंटरनेटवर त्याविषयी पूर्ण माहिती काढा.
पंप आणी डम्प सारख्या स्कीम मध्ये तुमचे पैसे गुंतवू नका, हि स्कीम म्हणजे कॉईन ची किंमत हळू हळू वाढवत नेली जाते आणी एका क्षणात ० होते, त्याने कॉईनच्या संचालकांचा फायदा होतो आणी इतरांचे नुकसान, तेव्हा काहीही झाले तरी स्वतः माहिती मिळवा, इतरांच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका.. ‘जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला’ हे लक्षात असुद्या..!!

बिटकॉईनबाबत सध्या देशातील गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढले असून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना बिटकॉइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

बिट कॉईन्स आणि इतर कॉईन करन्सीचा वापर करणे बेकायदेशीर असून, वापरकर्त्यांवर सावकारी, तसेच दहशतवादाला पैसा पुरविल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. बिट कॉईन किंवा इतर कोणत्याही कॉईन करन्सीची खरेदी, विक्री आणि साठेबाजी करण्याशी संबंधित प्रकरणाची रिझर्व्ह बँकेकडून चौकशी करण्यात येत आहे.

भारतातच नव्हे, तर जगभरात अनेक देशांनी अशा कॉईन करन्सीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडलेले उत्तम !