ज्ञानराज पाटील
पेठ वडगांव येथील विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल व डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये शेतकरी दिवस 23 डिसेंबर2017 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संभाजी माळी( प्रगतशील शेतकरी), अँड उदय महाजन, सीमा बायोटेक तळसंदेचे व्यवस्थापक विश्वास चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ,स्कूलचे संचालक डॉ. श्री. सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील 75 टक्के पेक्षा जास्त लोक शेती करतात. विद्यार्यांना आपल्या
संरकृतीची ओळख व्हावी. भारतीय अर्थव्यवरथेचा ‘कणा' समजला जाणा-या शेतक-याच्या विषयी माहिती मिळावी,
फळभाज्या, पालेभाज्या, अन्नधान्य निर्मिती व पुरक व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यांना अवगत व्हावी या हेतूने
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व चौधरी चरणसिंग यांच्या फोटो पूजनाने
झाली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांचा सौ विद्या पोळे यांच्या हरते शाल, श्रीफळ, पुस्तक व रोपटे देवून सत्कार करण्यात
आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे जीवन, शेती व त्याचे महत्व विशद केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून शेतकरी गीतांचे, नृत्यांचे बहारदार सादरीकरण झाले. यामध्ये शेतकरी त्यांचे परिश्रम, गावाकडील शेती यामधून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीवर प्रकाशझोत टाकला. संगीत विभागातून विद्यार्थ्यांनी शेतकरी जीवन, शेतकरी दादा, या
सारखी गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी हयावर आधारीत ‘शेतकरी नाटक सादर करून विद्यार्थ्यांनी शेतीवरील प्रेम व्यक्त केलेशेतकरी दिना निमित्त शक्ती साळोखे , नंदीनी कापरे, , पवित्रा माने, अवंती ढोके, . आर्या पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या भाषणात बोलतांना श्री संभाजी माळी यांनी भारतीय शेतीवर उत्तम विचार व्यक्त केले. शेतीची
अवस्था, पिकातून मिळणारे उत्पन्न तसेच आपण शेतक-यांची मुले आहोत. आपण शेतक-यांचा कसा सन्मान केला पाहिजे, शेतीची मशागत करून अत्याधुनिक शेती कशी केली पाहिजे, शेतक-यांना असणा-या समस्या, त्याचे जीवन,
परंपरागत शेती व आधुनिक शेती या बद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या बरोबरच श्रीमती
विजयादेवी यादव, सौ. विद्या पोळ, डॉ. सरदार जाधव यांनी ही आपले विचार व्यक्त केले. तसेच काही शेतकरी
पालकांनी आपले शेतीबद्दलचे अनुभव व्यक्त केले.
विद्यार्यांनी आपल्या पालकांनी शेतीमध्ये उत्पादित केलेली कृषी उत्पादने फळभाज्या, पालेभाज्या, विविध धान्य, कडधान्याचे नमुने प्रदर्शित करण्यात आले होते व त्याची माहिती आपल्या मित्रवर्गाला दिली. तसेच शेतकरी कशा प्रकारे उत्पादन घेतो याची माहिती सांगितली. त्याचा विद्यार्थ्यांना खूप लाभ झाला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या
अध्यक्षा सौ. विद्याताई पोळ, संचालक डॉ. सरदार जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. स्नेहल नार्वेकर, श्री भीमा गोणी, सांस्कृतीक विभाग प्रमुख निता मोरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांनी विशेष
परिश्रम घेतले यावेळी शाळेचे सर्व शिक्षकपालक उल्लेखनीय संख्येने उपस्थित होतेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका सुतार व श्रावणी शारवीद्र यांनी केले. आभार प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment