Tuesday, 12 December 2017

शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनमध्ये राजर्षी शाहू विद्यामंदीर क्र.११ चे घवघवीत यश

** ज्ञानराज पाटील.

कसबा बावडा  परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या बाल वैज्ञानिकांनी प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूरच्या वतीने आयोजित शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०१७ २०१८ मध्ये *तृतीय क्रमांक* पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी ' शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि विज्ञान ' या विषयाअंतर्गत *"पर्यावरणपूरक शाळा (ecofriendly school)"* हे अभूतपूर्व, आदर्श , आकर्षक असे राजर्षी शाहू विद्यालयाचे थर्माकोलचे  मॉडेल  सादर केले.
शाळेचे विद्यार्थी बापू गाढवे व हर्षदीप दाभाडे यांनी मांडलेले
हे आदर्श शाळेचे मॉडेल संपूर्ण विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.विद्यार्थी ,बालवैज्ञानिक, शास्रज्ञ,पालक, भागातील हौशी विज्ञान रसिक,नागरिक सर्वांनी सदर मॉडेलचे व विद्यार्थ्यांच्या कल्पनेचे कौतुक करून पर्यावरणपूरक शाळा ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
सदर मॉडेलमध्ये शाळेची विजेची गरज भागविण्यासाठी शाळेवर सोलर पॅनल,  पोषण आहार शिजवण्यासाठी सौरचुलीचा वापर, शालेय सांडपाण्याचा वापर शालेय बागेसाठी व पोषण आहारासाठी आवश्यक भाजीपाला उत्पादनासाठी केलेचे दाखविण्यात आले होते.
तसेच हात धुण्यासाठी व जेवल्यानंतर चूळ भरण्यासाठी आयुर्वेदिक कडुनिंबाच्या पानाचा व सालीचा वापर, शाळेतील कचरा खरकटे अन्न, ओला कचरा,फळांच्या साली ,उरलेला पोषण आहार या पासून कंपोस्ट खत निर्मिती आदी आधुनिक संकल्पना या मॉडेलमध्ये दाखविणेत आल्या आहेत.
या बाल वैज्ञानिकांना शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील सर,विज्ञान शिक्षक अरुण सुनगार सर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी विश्वास सुतार साहेब,नगरसेविका मधुरीताई लाड मॅडम ,शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई मॅडम, विजय माळी सर,बाळासाहेब कांबळे,शाळा व्यावस्थापण समिती चे अध्यक्ष प्राजक्ता शिंदे, उपाध्यक्ष पल्लवी पाटील, रमेश सुतार,रजनी सुतार वैशाली कोरवी,उत्तम कुंभार,सुशील जाधव,सुजाता आवटी ,जयश्री सपाटे ,प्राजक्ता कुलकर्णी ,आसमा तांबोळी,शिवशंभू गाटे सर आदींनी मुलांचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment