Monday, 4 December 2017

इचलकरंजी - कोल्हापूर बस प्रवाशांच्या सोयीसाठी कि गैरसोयीसाठी ?

इचलकरंजी बस स्थानकातुन सकाळी कोल्हापुर ला जाणारी बस पहिली बस सकाळी 5. 3O ला आहे  त्यानंतर 6. 35 ला आहे , जर प्रवाशांना येताना थोडा लेट झाला तर एक तास वाट  पहावी लागते , जर प्रवाशी वेळेवर येऊन सुध्दा बस बंद आहे अशी उत्तरे प्रवाशांना ऐकावी लागत असेल , दररोज हेच घडत आहे , 6 .35 कुरुंदवाड- कोल्हापूर बसची शंभर भर प्रवासी वाट पाहत असतात , स. 5. 30 , स. 6. OO ची बस का बंद केली आहे हे मात्र काही कळल नाही , प्रवासी मोठ्या आशेने येतात व ताटकळत बसतात , व्यवस्थापक उडवा उडवीची उत्तरे देतात, कोण काय करणार , वाईट अवस्था आहे  नोकरी, व्यापारी , दररोज जाणारी मंडळी आहे त, बहुतेक डेपोमध्ये गाडया नाहीत प्रवासी जीव मुठीत धरून वडाप चा मार्ग स्विकारत आहेत, अशी तक्रार दररोज इचलकरंजी - कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.
               यावर आम्ही इचलकरंजी बस स्थानक वाहतूक नियंत्रक यांना विचारले असता, 
सौंदत्ती यात्रा व शालेय सहलीला बसेस पाठवल्याने हा प्रकार घडला आहे, तसेच बसेस ची संख्या कमी आहे असे सांगितले. पण लवकरच सकाळी 5.30 व 6.00 ची बस पुर्ववत सुरू करण्याचे आश्‍वासन वाहतूक नियंत्रक दिपक इजारे यांनी दिले.

No comments:

Post a Comment