कोल्हापूरः प्रतिनिधी
पंचगगा नदीवरील शिवाजी पूलावरून टेम्पो ट्रॅव्हलरने पूलाचा कठड्याला धडकून नदीत खाली पडली . रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या अपघातात जवळपास 10 पेक्षा जास्त मृत्यूमुखी झाल्याची माहिती आहे.
जखमी बालेवाडी पुणे येथील असून गणपतीपुळ्याहून देवदर्शन करून कोल्हापुरात येताना शिवाजी पुलाचा मजबूत लोखंडी कठडा तोडून ट्रॅव्हलर MH12 NS 8556 पंचगंगा नदीत पडली. ट्रॅव्हलरमध्ये केदारी नामक कुटुंबातील 16 व चालक असे 17जण प्रवास करत होते.
कोल्हापूर बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवानांनी मदतकार्य सुरू केले . या अपघातातील ७ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून काहीजण गाडीत अडकून पडले आहेत.
इतरांना जलसमाधी मिळाली अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चालकाने मद्यपान केले असावे असे बोलले जात आहे. गाडी काढण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली असून घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे.
No comments:
Post a Comment