Monday, 1 January 2018

नवीन सालात नवीन स्विफ्ट कार

ज्ञानराज पाटील

भारतीय कार बाजारात लोकप्रिय असणारी मारुती सुझुकी स्विफ्ट कार 2018 मध्ये नवीन देखण्या व आकर्षक रुपात लॉंच होत आहे.
2005 मध्ये पासून भारतीय बाजारात आजअखेर जवळपास 54 लाख स्विफ्ट विक्री झाली आहे.
नवीन स्विफ्ट हि दिसायला आकर्षक तर आहेच पण वजनालाही हलकी आहे.
या नवीन स्विफ्ट चे वजन 850 kg पेट्रोल व 950 kg डिझेल प्रकारात असणार आहे.
यामुळे अॅव्हरेजवर चांगलाच फरक पडणार असून अंदाजे 21 kmpl पेट्रोल व 28 kmpl डिझेल ची अपेक्षा आहे.
जुन्या स्विफ्ट मध्ये अपघाती सुरक्षिततेच्या ज्या काही त्रुटी व कमतरता होत्या, त्यांचा अभ्यास करण्यात आला असून सर्व जागतिक सुरक्षा निकषावर आधारित यंत्रणा नवीन स्विफ्ट मध्ये असणार आहे.
कंपल्सरी 2 एअर बॅग, इबीडी, एबीएस, लेसर लाईट, अॅटोमॅटीक गिअर, नवीन सुरक्षा निकष असणारी चेसीस, मोठी डिकी, रिव्हर्स कॅमेरा, 7 इंची टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम व नॅव्हीगेशन अशी भरगच्च वैशिष्टय़पूर्ण असणारी नवीन स्विफ्ट लवकर बाजारात येणार आहे.
स्विफ्ट ची लोकप्रियता पाहता बुकिंगनंतर 6 ते 10 महिने वेटींग पिरियड असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment