कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या बाल खेळाडूंनी कै. संदीप स्पोर्ट्स व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 14 वर्षाखालील शालेय विद्यार्थी कबड्डी स्पर्धा २०१७ २०१८ मध्ये *तृतीय क्रमांक* पटकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांना आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब ,महापौर स्वाती येवलुजे, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक मोहन सालपे,केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, श्रीराम सोसायटी संचालक धनाजी गोडसे,प्रशांत पाटील,सुधाकर कसबेकर,निशिकांत कांबळे, ओंकार कांबळे, रमेश माने यांच्या प्रमुख उपस्थितीत चषक ,प्रमाणपत्र व बक्षीस देणेत आले.
या क्रीडापटूमध्ये कर्णधार समीर शेख,सिद्दार्थ मोरे,प्रशांत शिंदे, अमित पाटोळे ,प्रेम चव्हाण ,मोहित जाधव ,ओंकार काशीद ,साहिल शेख ,रोहित आवळे, राजवर्धन आडनाईक,अरमान पठाण आदी खेळाडूंच्या कबड्डी कौशल्याचे पूर्ण परिसरातून कौतुक केले जात आहे.
या बालक्रीडापटूंना शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील ,उत्तम कुंभार,सुशील जाधव,,सुजाता आवटी,,शिवशंभू गाटे सर ,मंगल मोरे,हेमंतकुमार पाटोळे,इतर शिक्षकवृंद यांचे मार्गदर्शन लाभले.
▼
No comments:
Post a Comment