सिद्धनेर्ली (वार्ताहर) दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे सध्या पिंपळगाव खुर्द (ता कागल) येथील गावकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे यावर उपाय म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीने तलावाशेजारी असणारी गावच्या पाण्याची सोय करण्यासाठी असणारी विहीर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतलेले आहे .लवकरच ह्या हे काम पूर्ण होणार असून या पुढे या विहिरीच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
सध्या पिंपळगावला पाणी पुरवठा हा दुधगंगा नदीतून केला जात आहे ,पण काही वेळेला ह्या पाण्याच्या कमतरतेमुळे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ,ह्या आधी या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गावात असणाऱ्या विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जायचा पण जेव्हा पासून नदीच्या पाण्यावर गावकार्याची तहान भागू लागली आहे तेव्हा पासून ह्या विहिरीकडे साफ दुर्लक्ष झालेलं होते त्या मुळे सध्या ह्या विहिरीतील असणारे पाणी पूर्ण पणे हिरवे झालेले आहे त्याच बरोबर विहिरीच्या कठड्यावर आणि शेजारी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.वेळीच लक्ष न दिल्याने सध्या ह्या विहिर मोडकळीस आली आहे.नदीतील पाणी कमी पडू लागणल्याने पुन्हा ह्या विहिरीकडे प्रशासनाचे लक्ष गेल्याने सध्या ह्या ठिकाणी स्वच्छतेचे काम ग्राम पंचायतीने हाती घेतले आहे.
फोटो-पाणी पुरवठा करणयात येणाऱ्या विहिरींची स्वछता करताना पिंपळगाव खुर्दचे ग्रामपंचायत कर्मचारी (छाया -रवींद्र पाटील)
▼
No comments:
Post a Comment