Monday, 29 January 2018

केडीसीसीच्या विविध कर्ज योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व कॅशलेस व्यवहार करावा - संजय कुडचे

हेरले /प्रतिनिधी  दि.र९/१/१८
       मौजे वडगाव येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने चालू केलेल्या विविध कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व कॅशलेस व्यवहार करावा असे प्रतिपादन हातकणंगले तालुका आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख संजय कुडचे यांनी केले. ते दत्त विकास सेवा सोसायटीमध्ये शेतकरी सुसंवाद मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशीनाथ कांबळे होते.
       केंद्रप्रमुख कुडचे पुढे म्हणाले की ;केडीसी बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यामध्ये सुवर्णकन्या सोने खरेदी योजना ,छोटे व्यापारी यांच्यासाठी उन्नती योजना , व्यावसायिकांसाठी गृहकर्ज योजना , आधार पेन्शन योजना , हम सफर वाहनकर्ज योजना , पगारदारांसाठी गृहकर्ज योजना , तर शेतकऱ्यासांठी बिनव्याजी सोलर खरेदी कर्ज योजना, 'तसेच पुरुष व माहिला बचत गटांसाठी विविध योजना असून अधिक माहीती साठी संबधीत जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
     या प्रसंगी हेरले शाखेचे बँक इन्स्पेक्टर आर .डी. चौगुले , अनिल कांबळे , पोलिस पाटील आमिर हजारी  प्रकाश सावंत , गौतम तराळ ' कृष्णात गोरड रघुनाथ काकडे , मोहन शेटे , महालिंग जंगम ;मनोहर चौगुले ,  वंदना भोसले , राजश्री लोहार ;यांच्यासह संचालक  कर्मचारी वर्ग तसेच शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अॅड.विजय चौगुले यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव महेश माने यांनी मानले.
        फोटो कॅप्शन
मौजे वडगांव येथे मार्गदर्शन करतांना आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख संजय कुडचे व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment