कोल्हापूर
वालचंद काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पस्तीस विद्यार्थी मालवाहतूक आयशर टेम्पो ( MH10 Z 2787 ) मधून व चार विद्यार्थी दोन मोटारसायकलवरून ( MH09 EE 7576 ) व ( MH10 BY 7651 ) आणि एक विद्यार्थी ज्योत घेऊन धावत असे चाळीस विद्यार्थी पन्हाळगडावरुन सांगलीला निघाले होते. शिये फाटा येथून ते महामार्गावर आले व शिरोली सांगली फाटा येथून ते सांगलीला जाणार होते. शिरोली एमआयडीसी येथील व्हीआरएल ट्रान्सपोर्ट समोर ज्योतमध्ये तेल घालण्यासाठी दोन मोटारसायकली थांबल्या. त्याच्या मागील बाजूस टेम्पोही थांबला. त्याचवेळी पुण्याहून बेळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने थांबलेल्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. याधडकेमुळे टेम्पो समोर उभारलेल्या मोटारसायकलींवर आदळला व महामार्गावर पलटी झाला. टेम्पोतून अनेक विद्यार्थी महामार्गावर आपटले. शिवाय समोर मोटारसायकलींवर असणारे विद्यार्थी टेम्पोखाली चिरडले गेले. घटनास्थळावरील चित्र विदारक व हृदय पिळवटून टाकणारे होते.
हि बातमी सकाळ ने दिली आहे.
तर आणखी एका बातमी नुसार पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होते. सांगलीला जात असताना समोरून आलेल्या बाइकला चुकविताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच ट्रक कलंडला. त्यामुळे ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment