प्रतिनिधी दि. १९/२/१८ - सलीम खतीब
कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर हेरले माळभाग येथे मारुती स्वीफ्ट कार व दोन ट्रक यांच्यामध्ये धडक होऊन स्वीफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले व कारमधील पाच प्रवासी जखमी झाले.
मालवाहू ट्रक क्र. ( KA39-4344) हा कोल्हापूर दिशेने जात होता. हेरले माळभाग या ठिकाणी आल्यावर चालकाने अचानक ब्रेक मारला. याच वेळी पाठीमागून येणारी स्विफ्ट कार क्र .(MH09 BM 2483) ही पुढील ट्रकच्या पाठीमागील बाजूकडे जाऊन जोराने धडकली. त्याचवेळी पाठीमागून येणारा मालवाहू ट्रक क्र. (MH09 L 5602 ) चालकास गाडी आवरता आली नाही. त्यामुळे स्विफ्ट च्या पाठीमागील बाजूस ट्रकाची जोराची धडक बसली. या दुहेरी अपघातामध्ये स्विफ्ट कारच्या पुढच्या व मागच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमध्ये अनिल पाटील यांच्यासह चार प्रवाशी होते. त्यांना दोन्ही बाजूने जोराची धडक बसल्याने दुखापतीने जखमी झाले.
अपघात घडताच हातकणंगले पोलीसांनी घटना स्थळावर येऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील ट्रकचालक अपघाताच्या घटनेचे गांभिर्य पाहून पसार झाला. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.
फोटो - हेरले ( ता. हातकणंगले) येथील दुहेरी अपघातात स्वीफ्ट कारचे मोठे नुकसान झाले.
No comments:
Post a Comment