Saturday, 17 February 2018

डॉ.एन.डी.पाटील व डी.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण बचावाचा लढा देण्याचा निर्धार

कोल्हापूर / प्रतिनिधी दि१७/२/१८
    मिलींद बारवडे
शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून  बंद केल्या जाणाऱ्या  शाळांना विरोध करण्यासाठी शिक्षण बचाव नागरिक कृती समितीच्यावतीने दिला जाणारा लढा ज्येष्ठ नेते डॉ.एन .डी. पाटील व जेष्ठ शिक्षणतज्ञ  डी .बी.पाटील  यांच्या नेतृत्वाखाली देण्याचा निर्धार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी   शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आयोजित बैठकीत दिला.कृती समितीच्या या निर्णयास शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला.
      शैक्षणिक  व्यासपीठाच्या वतीने श्री प्रिन्स  शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे  आयोजित बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला .बैठकीच्या अध्यक्षस्थानी डी .बी. पाटील होते .

           शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी. लाड यांनी मुंबई येथे २२ फेब्रुवारी रोजी  मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच आझाद मैदानावर २८ फेबुवारी  २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन ही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.  या धरणे आंदोलनामध्ये विविध संघटनांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले .त्यांच्या निर्णयास विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला . महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शिक्षक कृती समितीच्या वतीने दहावी व बारावीच्या पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारास ही  यावेळी शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला .
      माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी माध्यमिक शिक्षकांचा पगार तातडीने  काढल्याची कार्यवाही केल्याबद्दल  त्यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला .
      यावेळी नागरी कृती समितीचे वसंतराव मुळीक , अशोक  पोवार , कॉ. नामदेव गावडे , रमेश मोरे , पापा भोसले ,गणी आजगेकर , गिरीश फोंडे शैक्षणिक व्यासपिठाचे व्ही.जी. पोवार , आर.डी. पाटील , आर .वाय. पाटील , वसंतराव देशमुख , जयंत आसगांवकर , खंडेराव जगदाळे,सुधाकर निर्मळे , मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट,डॉ.ए.एम. पाटील , बी.डी. पाटील , बी.एस. खामकर , उदय पाटील , सी.एम. गायकवाड , बी.जी. बोराडे , सी.आर. गोडसे , संदीप पाटील आदीसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .

         फोटो
कोल्हापूर : शैक्षणिक व्यासपिठाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संस्था चालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख सोबत अन्य पदाधिकारी 

         

       

No comments:

Post a Comment