सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना काल अटक झाली होती.
त्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. तात्काळ त्यांच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.
सोशल मीडियावर डी एस के कोठडीत तोल जाऊन पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यातच त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती व्हायरल होत आहे.
सध्या डीएसके यांच्यावर ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment