Tuesday, 13 February 2018

'डॉ. सायरस पूनावाला’ स्कूलमध्ये भरला आजी-आजोबा स्नेहमेळावा.जुन्या आठवणींना दिला नवीन उजाळा.

कोल्हापूर ‘पेठ वडगांव, :-

येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2017-2018 सालचा आजी आजोबा स्नेहमेळावा रविवार दि.11 फेब्रुवारी, 2018 रोजी मोठया उत्साहात पार पडला. जुन्या आठवणी ....नातवाची शाळा... हाताला धरून आजोबांना शाळेची विस्तृत माहिती सांगणं...वयोवृद्ध असूनही शाळेबद्दल ओढ... पिकलेले केस.... चेह-यावर हास्य .... नातवाच्या शाळेबद्दल प्रेम हे वर्णन म्हणजे आजी आजोबांच्या उपस्थितीने भारावून गेलेले पूनावाला स्कूलचे आंगण म्हणावे लागेल. आधुनिक युगामध्ये, यांत्रिक युगामध्ये आईवडिलांच्या पेक्षाही तितकेच मोलाचे आजी आजोबा म्हणजे मार्गदर्शनाचा दीपस्तंभ  म्हणावा लागतो. संस्कार, मूल्ये, विचार यांची सांगड घालून आजी आजोबांना  आदर सन्मान देणे हाच हयामागचा पवित्र हेतू.
आजी आजोबांचे मार्गदर्शन जीवनाची दिशा दाखवू शकते हा विचार मनी घेऊन ‘आजी-आजोबा’ स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला होता.आजी आजोबा स्नेहमेळाव्यात बोलताना डॉ.शिंदे म्हणाले की, विद्यार्थी घडत असताना त्याला आजी आजोबाच्या संस्काराची शिदोरी मिळाली की त्याचे व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. आजी आजोबा म्हणजे मुलांचे गप्पागोष्टीचे माहेर घर असते असे सांगून विद्यार्थ्यानी आजी-आजोबाकडून संस्काराचे धडे घ्यावेत असा उपदेश दिला. उपस्थित आजी आजोबांना आहार, प्राणायम याव्दारे शारिरीक स्वास्थ्य टिकवावे असे सांगून त्यांनी आजी आजोबांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अभिष्टचिंतन ही केले.आपले विचार व्यक्त करताना सौ. विद्या पोळ म्हणाल्या की यांत्रिक युगामध्ये मुल्यांची चांगल्या प्रकारची जोपासना होण्यासाठी आजी-आजोबा चे संस्कार पाल्याला मिळणे आवश्यक असते. त्याचे बीज, त्याची शिकवण विद्यार्थी दशेतच मिळावी जेणेकरून विद्यार्थी संस्कारक्षम बनेल आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केला असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांनी केले व त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आजी-आजोबा दिवस साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
त्यानंतर ‘‘वीणा वादिनी वर दे’’ या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाष षिंदे त्यांच्या शुभहस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ व स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ (ताई), स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्या सौ.स्नेहल नार्वेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सांस्कृतीक कार्यक्रमात अनेक मराठी व हिंदी गीते व नृत्य सादरीकरण करण्यात आले.आजी-आजोबांना शाळेच्या प्रांगणामध्ये मनोरंजनासाठी फनी गेम्स ठेवण्यात आल्या होत्या तसेच त्यांना उंट, बैलगाडी, घोडे, यांच्यावरती बसवून त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला. तसेच या स्नेहमेळाव्यामध्ये हया स्नेहमेळाव्यास काही आजी-आजोबा व नातवंडानी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास अनेक शुभेच्छा दिल्या. या आजी आजोबा मेळाव्यास जवळ जवळ 2000 ते 2500 आजी-आजोबा उपस्थित होते.शाळेची संपूर्ण सजावट करण्यात आलेली होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षीका, कीडाशिक्षक, प्रशिक्षक , शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहमेळाव्यास श्री. शाहु शिक्षण प्रसारक सेवा मंडळ पेठ वडगावचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव यांची प्रेरणा मिळाली तर संस्थेच्या सचिव व डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचे प्रोत्साहन, स्कूलचे संचालक डॉ.सरदार जाधव, प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थीनी स्पृहा पाटील व टिना परचानी यांनी केले तर आभार प्रदर्शन माधवी सावंत यांनी मानले व वंदे मातरने कार्यक्रमाची सांगता झाली.

आजी-आजोबा स्नेहमेळाव्यामध्ये फनी गेम्स्चा आनंद लूटताना

No comments:

Post a Comment