Thursday, 8 February 2018

निवडलेल्या क्षेत्रात ज्यांना आयुष्यभर विद्यार्थी राहणाऱ्यांची वाटचाल अलौकिक बुध्दीमत्तेकडे - अविनाश धर्माधिकारी

प्रतिनिधी दि. ८/२/१८
    निवडलेल्या क्षेत्रात ज्यांना आयुष्यभर विद्यार्थी म्हणून रहायचे कळलंय त्यांची वाटचाल अलौकिक बुध्दीमत्तेकडे चालू राहाते. असे मत निवृत्त जिल्हाधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
      ते विवेकानंद काॕलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी पारितोषक वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी विवेकानंद काॕलेजची विद्यार्थिनी कु. शिवानी राजू पाटील हिने फिजीक्स  विषयात शिवाजी विद्यापीठात  प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अभयकुमार साळुंखे तर प्रमुख उपस्थिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची होती.
       ते पुढे म्हणाले , आईन्स्टाईन यांनी विद्यापीठात फिजीक्स विषयात डाॕक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण फिजीक्सचे विद्यार्थी होतो. अशी स्वता;ची ओळख करुन देत होते. असे धर्माधिकारी यांनी सांगितले . स्वागत  प्रास्तविक व पाहुण्यांची ओळख अभयकुमार साळुंखे यांनी करुन दिली. तसेच  प्राचार्या शुभांगी गावडे यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डाॕ.मिलींद कारंजकर, प्रा. मालगावकर, प्रा. नवाते , प्रा. पट्टणशेट्टी , प्रा. थोरात, प्रा. पाटणकर, यांच्यासह शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. किरण पाटील यांनी मानले.
        फोटो
कोल्हापूर .. विवेकानंद काॕलेजची विद्यार्थिनी कु. शिवानी पाटील हिचा शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक आलेबद्दल सत्कार करताना अविनाश धर्माधिकारी . प्रसंगी शुभांगी गावडे , महेश जाधव , अभयकुमार साळुंखे आदी.

No comments:

Post a Comment