सरुड/प्रतिनिधी
कोकणे अविनाश-
सरुड ता. शाहूवाडी येथे अनेक दिवसांपासून लांब उडी मैदानाचे व्यवस्थापन करण्यात अपयश येत होते. पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी अडचणी किंवा वाळू अल्प प्रमाणात असल्याने गुडघ्याचे त्रासाला सामोरे जावे लागत होते.अनेक शारीरिक दुखापत होताना दिसत होत्या.त्यामुळे शिवशाहू महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गाढवे सरांच्या लक्षात येताच महाविद्यालयाच्या निधीतून लांब उडी मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्यात मोलाचा वाटा उचलला. उद्घाटन करण्यासाठी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांना आमंत्रित केले होते . त्यांनी फीत कापून मैदान सर्वांसाठी खुले केले .
यावेळी प्रा. गाढवे सर,प्रा.बुरशे सर, प्रा.वाघमारे सर तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
▼
No comments:
Post a Comment