Tuesday, 13 February 2018

' खेलो इंडिया खेलो ' राष्ट्रीय खो-खोमध्ये वाळव्याची कन्या रितिका मगदूमने महाराष्ट्र संघाला मिळवून दिले सुवर्णपदक

वाळवा प्रतिनिधी - अजय अहिर  (पत्रकार)

दिल्ली येथे झालेल्या पहिल्या  शासकीय शालेय 'खेलो इंडिया खेलो ' राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये  वाळव्याची कन्या  रितिका जीवन मगदूम  हिने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. शासनाकडून  पाच वर्षासाठी पाच लाख रुपये शिष्युवृत्ती मिळणार आहे. स्व. अरुण (भैय्या ) नायकवडी युवा मंच वाळवा या क्लब कडून खेळत आहे.  तिने अनेक राज्य/ राष्टीय खो- खो स्पर्धा खेळली आहे.या  निमित्ताने काल सायंकाळी 6 वाजता रितिका मगदूम ची वाळव्यामध्ये मिरवणूक काढण्यात आली.
हुतात्मा किसन अहिर यांना पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात केली. नागरिकांनी व वीर सेवा दल ग्रुप, टायगर ग्रुप, नटराज ग्रुप, विराचार्य ग्रुप,राजेंद्र पाटील ग्रुप , व प्राचार्या- सुषमा नायकवडी, सरपंच डॉ- शुभांगी माळी यांनी  मगदूम हिचा सत्कार केला. 'खेलो-इंडिया खेलो' राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये रितिका मगदूम हि सांगली जिल्ह्यात पहिली  खेळाडू ठरली आहे.  अभिजित नायकवडी , हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष मा.गौरव नायकवडी , सावकार कदम, संचालक- शिवाजी अहिर, संचालक- धिंनाप्पा मगदूम, सदस्य - वर्धमान मगदूम, सर्व खेळाडू , माजी खेळाडू , प्रशिक्षक , शिक्षक, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment