हातकणंगले/ प्रतिनिधी
सलीम खतीब
दि. १७/३/१८
स्टार अॅकॅडमी यांच्या मार्फत शैक्षणिक क्षेत्रातील दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्टार संस्थापक पुरस्कार संस्थाचालक प्रा. जयंत आसगावकर, अशोक चराटी, अशोक पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्टार उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार सुधाकर निर्मळे ( कागल) अशोक कांबळे ( म्हाळुंगे), राहुल फुटाणे (कडगांव)
स्टार मुख्याध्यापक पुरस्कार -भगवंत पाटील (करवीर) सुरैय्या मुजावर (रुकडी), संतोष पाटील (कागल)
स्टार आदर्श शाळा पुरस्कार श्री बळवंतराव यादव हायस्कूल पेठवडगांव, विद्या मंदिर भैरेवाडी सावर्डे बुद्रक
स्टार आदर्श शिक्षक पुरस्कार -भारत सावळवाडे ( दत्तवाड) इकबाल मुजावर (कागल), महेश सुर्यवंशी ( कोल्हापूर )
स्टार शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार-बजरंग गरूड ( गडहिंग्लज), पांडुरंग जाधव ( कसबा वाळवे ) आदी शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करणाऱ्यात येणार आहे.
शोध शिक्षणातील ताऱ्यांचा सन्मान कर्तृत्वाचा गौरव समारंभ कार्यक्रम रविवार दि. २५ मार्च रोजी दुपारी २.३० वा. शाहु स्मारक भवन दसरा चौक येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण उपसंचालक शरद गोसावी, प्रमुख पाहुणे डॉ. योगेश जाधव, प्रमुख उपस्थिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, अमोल कोरगावकर, प्रा.डी.एस. घुगरे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष दिपक शेटे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
No comments:
Post a Comment