Saturday, 17 March 2018

अन्यायकारक नोटीसा बजावलेल्या शाळेतील शिक्षकांच्या पाठीशी शैक्षणिक व्यासपीठ - एस डी लाड

मिलींद बारवडे
कोल्हापूर / प्रतिनिधी दि. १७/३/१८
कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या शाळांना शिक्षण बचाव आंदोलनाबद्दल  शिक्षण  विभागाकडून अन्यायकारक  नोटीसा बजाविल्या आहेत. त्या शाळेतील शिक्षकांच्या पाठीशी शैक्षणिक व्यासपीठ असून त्यांनी घाबरण्याची काही गरज नाही. शिक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या नोटीसा पाठीमागे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. असा पाठींबा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने अध्यक्ष एस.डी. लाड यांनी बैठकीत व्यक्त केला.
      कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शैक्षणिक कार्याबद्दल बैठक श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग मध्ये आयोजित केली होती. यामध्ये विविध विषयावर निर्णय घेण्यात आले.
         कोल्हापूर शहरातील शिक्षण हक्क कायदया नुसार शाळा मान्यता प्रस्ताव तपासून प्रशासन अधिकारी मनपा कोल्हापूर यांचे समोर पोहचल्या आहेत. मात्र अध्याप ते प्रस्ताव प्रलंबीत आहेत. ते प्रस्ताव शिफारस करून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे त्वरीत पाठवाव्येत अन्यथा व्यासपीठाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
           अंगणवाडी शिक्षिकांना मेस्मा कायदा लावून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांचा निषेध बैठकीत करण्यात आला. तर बी. एल. ओ. साठी हायकोर्टातून स्टे आणल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले .
                 या प्रसंगी शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड, व्ही.जी. पोवार, आर. वाय. पाटील, व. ज. देशमुख, जयंत असगावकर, सुधाकर निर्मळे, डॉ.ए.एम. पाटील, बी.डी. पाटील, उदय पाटील, एम.के. पोवार, प्रभाकर आरडे, सी.एम. गायकवाड, बी.जी. बोराडे, सी.आर. गोडसे, प्रकाश पाटील, गजानन काटकर,आर.डी. पाटील, अशोक पाटील, ,मिलींद बारवडे, व्ही.जी. पाटील, बी.बी. पाटील, लक्ष्मण कांबरे, शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक अशोक पोवार, रमेश मोरे.
        फोटो कॅप्शन
शैक्षणिक व्यासपीठ बैठकीत बोलतांना अध्यक्ष एस.डी. लाड व इतर पदाधिकारी.

No comments:

Post a Comment