कसबा बावडा, दि.18 मार्च 2018
कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा. राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११,कसबा बावडा,कोल्हापूर च्या वतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या नवागतांचे स्वागत या उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते.त्याअंतर्गत पाहिलीसाठी नवीन म्हणून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत पाटी, पेन्सिल,गणवेश, गुलाबपुष्प , फुगे व चॉकलेट देऊन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा पल्लवी पाटील,शुभांगी चौगले, जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार,शीला दाभाडे,अमर लाखे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी " छोटी बालके हीच खरी देशाची व समाजाची संपत्ती आहे.मुलीचे व बालकांचे शिक्षण हेच खरे प्रगतीचे लक्षण आहे.मुले शिकली तरच समाज सुशिक्षित घडणार आहे. असा प्रगतीचा मूलमंत्र दिला."
उपाध्यक्ष पल्लवी पाटील यांनी "पालकांनी मुलांच्याकडे लहानपणापासून लक्ष दिले तरच मुले हि संस्कारक्षम बनतील व त्यांना जीवनातील कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळेल",असे प्रतिपादन केले.मीना व राजू मंच च्या प्रमुख सुजाता आवटी यांनी मुलांना चॉकलेट देऊन अभिनंदन व स्वागत केले
कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव,सुजाता आवटी,शिवशंभू गाटे,आसमा तांबोळी ,मंगल मोरे,शीला दाभाडे,अमर लाखे,श्रुती चौगले,निषिका शिंदे,मृणाली दाभाडे,रसिका माळी,वेदिका पाटील, कादंबरी चौगले यांनी कार्यक्रम साठी परिश्रम घेतले,
कार्यक्रमास भागातील पालक व आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुशील जाधव यांनी कार्यक्रमचे संयोजन केले तर सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले,आभार मयुरी कांबळे हिने मानले.
No comments:
Post a Comment