Monday, 19 March 2018

शुक्रवारी २३ मार्चला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार  जेष्ठ विचारवंत एन.डी.पाटील व जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  निघणार महामोर्चा .


कोल्हापूर / प्रतिनिधी 

      मिलिंद बारवडे

     

   महाराष्ट्र शासनाच्या जनविरोधी शैक्षणिक धोरणांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यस्तरावर कार्यरत असणाऱ्या  शिक्षक संघटनांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक २३ मार्च २०१८ रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जेष्ठ विचारवंत एन.डी. पाटील व जेष्ठ शिक्षणतज्ञ डी.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन देण्यात येणार आहे.

           कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झालेल्या बैठकीत विविध संघटनांच्या प्रमूख पदाधिकारी व शिक्षण बचाव नागरी कृती समितीच्या समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपिठाचे  अध्यक्ष एस .डी .लाड होते .

        यावेळी सभा अध्यक्ष एस.डी. लाड म्हणाले ,राजर्षी  शाहू महाराजांनी १९१७ मध्ये आपल्या संस्थानात मोफत प्राथमिक  शिक्षणाचा कायदा करून त्याची यशस्वी अंमलबजावणी करून बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराचे मौलिक  कार्य केले .आणि याउलट आता २०१७ मध्ये  सरकारी शाळा बंद करून शिक्षणाचे कंपनीकरण केले जात आहे . कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळांमधील शिक्षण महागडे असणार आणि ते गरिबांच्या आवाक्याबाहेरचे असणार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या अशैक्षणिक धोरणांना शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे व शैक्षणिक व्यासपिठाच्या वतीने  सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता मोठया प्रमाणात वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला .यावेळी शिक्षक नेते दादा लाड , संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख ,प्रा.सी.एम.गायकवाड , सुरेश संकपाळ ,सचिव जयंत आसगावकर , वसंतराव मुळीक ,अशोक पोवार ,रमेश मोरे ,गिरीश फोंडे ,गणी आजरेकर, व्ही.जी. पोवार , आर. वाय . पाटील , भरत रसाळे , सुधाकर निर्मळे , मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट , आर.डी. पाटील , प्रभाकर आरडे , राजेश वरक, उदय पाटील , संदीप पाटील , बाबा पाटील , गजानन काटकर , प्रकाश पाटील , सुधाकर सावंत , समीर घोरपडे , डी.ए. जाधव. लालासाहेब गायकवाड , गणपतराव बागडी , उमेश देसाई , सुनिल गण बावले , सुनिल पाटील आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .

          

No comments:

Post a Comment