कोल्हापूर (रुपाली कागलकर)
कोल्हापूरचे फुटबॉल सामने म्हणले की प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत जत्रा भरते पण बर्याचदा हुल्लडबाजी आणि दंगा धुडगूस ही होतो व सामन्याला गालबोट लागते. यंदाच्या हंगामात छ.शाहू स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल सामन्या दरम्यान थ्री स्टार सिक्युरिटीवर सुरक्षेची जबाबदारी होती . यावेळी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल थ्री स्टार सिक्युरिटीचे मालक भारतकुमार ढंग याचा माजी महापौर दिगंबर फराकटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर होते.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील छ.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यात कसलाही दंगा किंवा गोंधळ झाला नाही. यावेळी या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांच्या बरोबर खेळाडू,प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
फोटो -थ्री स्टार सिक्युरिटीचे मालक भारतकुमार ढंग यांचा सत्कार करताना माजी महापौर दिगंबर फराकटे
No comments:
Post a Comment