प्रा.अनिल धस
(पर्यावरण अभ्यासक)
औरंगाबाद येथील कचरा समस्येमुळे भविष्यातील प्रत्येक शहर व परिसरामध्ये कसे वणवे पेटतील याची एक झलकच पाहायला मिळाली आहे. ही खरं तर मस्तवाल शहरांच्या विकृत मानसिकतेमुळे समस्या निर्माण झाली आहे.
आज ही शहरे च प्रचंड कचरा निर्माण करतात परंतु त्याची विल्हेवाट शहराजवळील भागात करतात
आपल्या जवळचे पाण्याचे स्रोत दूषित करून टाकतात व नंतर मात्र पिण्याच्या पाण्यासाठी जवळपासच्या जलसाठे,नद्या यावर हक्क सांगतात.
कोल्हापूर ची सुद्धा हीच स्थिती आहे. कोल्हापूर शहरानेसुद्धा आपल्या तोंडाशी निसर्गाने आणून दिलेला शुद्ध पाण्याचा ठेवा ' पंचगंगा' पूर्णपणे दूषित करून टाकला आहे व आपली तहान भागवण्यासाठी आता करोडो रुपये खर्चून दूरवरील धरणातून पाणी आणले जात आहे.
अशीच स्थिती आता इचलकरंजी शहराची होत आहे. वारणा नदीतून पाणी मिळावे यासाठी इचलकरंजी शहर या पाण्यावर आपला कसा हक्क आहे हे पटवून देत आहे तर स्थानिक वारणा वासीय यास प्रचंड विरोध करत आहेत. यातूनच 'पाण्यासाठी युद्ध' याची प्रचिती येत आहे.
मुळात आपल्या हक्काच्या पाण्याची काळजी घ्यायची गरज असताना तिथे मात्र निष्काळजी पणा दिसत आहे.
एकंदरीतच आपल्या आसपासचे नैसर्गिक स्रोत जर आपण काळजीपूर्वक वापरले तर ही समस्या निर्माणच होणार नाही.
-
छान लेख आहे सर ,नैसर्गिक स्रोत आपण काळजीपूर्वक वापरले पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद☺
Deleteजल है तो कल है
ReplyDeleteसही है
Deleteधावत्या आधुनिक युगात निसर्गाला विसरलेल्या मानवाने याचा विचार नक्की केला पाहिजे , आपण महत्वाची बाब दर्शवली आहे सर !!
ReplyDeleteधन्यवाद... शामल☺
Delete