प्रतिनिधी सतिश लोहार ............
. आज दि .२३मार्च रोजी तमाम शिक्षकांच्या वतीनं मा डॉ. एन .डी.पाटील व मा.डी.बी.पाटील .यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे महामोर्चा निघाला . सज्जनांनी मौन सौडलं नाही तर दुर्जनांचं नेहमीचं फावतं. अलिकडं सज्जन माणसं केवळ स्मशानातचं भेटतं असतात . आज मात्र प्रचंड संख्येनं सज्जन माणसं मौन सोडून रस्त्यावर उतरले आहेत. .... आजअखेर रस्त्यावर माणसं स्वत:च्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरत असतं. पगार वाढीसाठी,वेतन वाढीसाठी ,वेतन आयोग लागू होण्यासाठी रस्त्यावर न उतरता सामाजिक बांधिलकी म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. ......... गोरगरीबांच्या आयुष्यातील ज्ञानाचा प्रकाश गावातचं मिळावा,गरीबांच्या शाळा बंद पडू नयेत,खाजगी कंपनीकडे शाळा देऊन ज्ञानाचे खाजगीकरण होऊ नये म्हणून सर्वजन रस्त्यावर उतरले आहेत. .. .शिक्षणात जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी पूर्वी ब्रृहत आराखड्यानुसार गरज येथेचं शाळा हे धोरण राबविलं होतं.धनाड्यांच्या बगलबच्चांना शाळा काढताना ब्रृहत आराखडा अडचणीचा ठरतो म्हणून 'स्वयंअर्थसहाय्य व खाजगी कंपनीस शाळा' हे धोरण राबविलं जात आहे यास विरोध म्हणून सर्व शिक्षक , शिक्षक संघटना , पालक एकत्र येऊन लढा देत आहेत. ...बुद्धीवादी माणसं कधी एकत्र येत नाहीत.बुद्धीचा अहंकार त्यांना एकत्र येऊ देत नाही.पण आज सर्व बुद्धीवादी एकत्र आले .. फोडा आणि झोडा निती हे धोरणही येथे लागू पडले नाही. कारण एखाद्या ज्वलंतं प्रश्नावर जेंव्हा चळवळ उभी राहते तेंव्हा सर्व वैयक्तिक स्वार्थ गळून पडतात व सर्वजण एकत्र येतात. .कोल्हापूर मध्ये .. केवळ आणीबाणीतचं नव्हे तर सामाजिक प्रश्नावर स्वार्थाशिवाय आपण एक होऊ शकतो हे शिक्षकांनी , पालकांनी , विध्यार्थ्यानी आज दाखवून दिले , गांधी मैदान , दसरा चौक ते कलेक्टर ऑफीस पर्यत मोठया संख्येने मोर्चा निघाला.सरकार ने शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे , शिक्षण असेल तर चांगली पिढी घडेल ..
No comments:
Post a Comment