कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
लोकसभा निवडणुका 2019 ला असल्या तरी विरोधी पक्षांनी आघाडीची मोट आतापासूनच बांधायला सुरू वात केली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिरात शरद पवार हे 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवले होते . 2019 हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल, असा दावाही त्यांनी केला होता . कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन शिबिरात हे वक्तव्य केले असल्याने लोकांनी व प्रसार माध्यमांनी त्याची म्हणावी तेवढी दखल घेतली नाही पण आता लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी भारतीय राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचं पहायला मिळतंय. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. शरद पवार यांच्याकडे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. त्याच अनुषंगाने सोनिया गांधींच्या काँग्रेसने त्यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे.
पंतप्रधानपदासाठी शरद पवारच का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असाृ शरद पवार यांच्या तोडीचा एकही नेता नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उभरतं नेतृत्व आहेत, मात्र अनुभव आणि मुत्सद्देगिरीच्या बाबतीत ते नक्कीच कमी आहेत.
शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत ( अगदी मोदींसोबतही ) सौदार्हाचे संबंध आहेत. त्यांच्या नावाला सहसा कोणी विरोध करणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदींविरोधात लढण्यासाठी त्यामुळेच शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे.
आज काँग्रेसला गरज आहे सत्तेची व ती मिळवून देण्यार्या एका चाणक्याची. पवारांहून मोठा चाणक्य आज तरी देशात दुसरा नाही.
आता ते या कसोटीवर किती खरे उतरतात हे येणारा काळच ठरवेल.
No comments:
Post a Comment