कसबा बावडा प्रतिनिधी :
कसबा बावडा प्रतिनिधी :
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर ची कसबा बावडा येथील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजेे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम नगरसेविका माधुरीताई लाड , नगरसेवक अशोक जाधव, मोहन सालपे, मुख्याध्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील,सदस्य वैशाली करपे,रमेश सुतार,शिक्षण तज्ञ इलाई मुजावर,सनराईज रोटरी क्लबच्या गीतांजली ठोमके,लता देसाई,अमर माने,सचिन पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर प्रसंगी शहरस्तरीय कवायत स्पर्धेत प्रथम क्रमांक,विज्ञान प्रदर्शन,राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन स्पर्धा,स्कॉलरशिप परिक्षा,कबड्डी स्पर्धा,स्वाइन फ्लू पथनाट्य,महिला दिन पाक कला,मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व इतर स्पर्धेत यश मिळवलेल्या पालक व विद्यार्थी व परीक्षक यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
महापौर स्वाती यवलुजे यानी ,शाहू हस्तलिखित प्रकाशन प्रसंगी राजर्षी शाहू शाळेची *शाहू हस्तलिखित म्हणजे गुणवतेचा आलेख होय* असे मनोगत प्रकट केले.नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेतील गुणवतेबद्दल शिक्षक व पालक यांना आपल्या विद्यार्थ्यां कडे लक्ष द्या देशाचे सक्षम असा नागरिक घडवा असे शुभेच्छा दिल्या.
आसमा तांबोळी, मंगल मोरे,हेमतकुमार पाटोळे, अवधूत पाटोळे, अमर लाखे तसेच परीक्षक म्हणून प्राजक्ता शिंदे,पल्लवी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
भारतवीर मित्रमंडळाचे ,सचिन चौगले,चेतन चौगले,राजू चौगले,राहूल भोसले,स्वप्नील चौगले,कृष्णात चौगले व इतर कार्यकर्त्यांकडून शाळेला १० खुर्च्या भेट दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.व
शाळेला आर्थिक मदत दिली त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यात गीतांजली ठोमके मॅडम,शारदा पाटोळे,अमर माने,जावेद पखाली, रुद्र पाटील.सदर देणगीदारांचा सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला.
सदर स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने आपल्या अंगभूत कलागुणांचे सादरीकरण केले. सादरीकरण केलेल्या गाण्यांमध्ये देशभक्तीपर गीते,सर्वधर्म समभाव, लोकगीते,कोळीगीते,घुमर,ब्रेकडान्स, बालनाट्य,श्रीदेवी श्रद्धांजली,गोविंदा स्पेशल,देवीचा गोधळ आदी वैशिष्ट्यपूर्ण गाण्यांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याद्यापक अजितकुमार पाटील, नियोजन उत्तम कुंभार व सुशील जाधव यांनी केले.सुजाता आवटी,जयश्री सपाटे,प्राजक्ता कुलकर्णी,सेवक हेमंतकुमार पाटोळे,मंगल मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवशंभू गाटे व आसमा तांबोळी यांनी केले.
No comments:
Post a Comment