सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
सैनिकांच्या मुळेच आपण व आपला देश सुरक्षित असून त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे याच बरोबर महिलांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे .या भावनेतूनच पेरनॉड रिकार्ड इंडिया दिल्ली व सिंगापूर कंपनीने सैनिकांच्या पत्नी व गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटपाचा निर्णय घेतला असे प्रतिपादन या कंपनीचे जनरल मॅनेजर व्ही सि . नित्यानंदम यांनी सैनिक टाकळी येथील मोफत शिलाई वाटप कार्यक्रमात केले सामजिक कार्यकर्ते भवानीसिंह घोरपडे यांच्या प्रयत्नातून तसेच सैनिक समाज कल्याण मंडळ टाकळी व पेरनॉड रिकॉर्ड इंडिया या कंपनी कडुन सैनिक टाकळी व परिसरातील सुमारे १५० माजी सैनिक पत्नी व गरीब होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले स कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कर्नल विजयसिंह गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे म्हणून १०९ टी ए बटालियन चे ले. कर्नल मिलन शिंदे तसेच एक्ससाईज डिपार्टमेंट चे सुपरिटेंडेंट गणेश पाटील होते . कंपनीचे मॅनिफॅक्चर मॅनेजर नवेंदू तिवारी. असिस्टंट मॅनेजर संजय कदरे , सरपंच वंदना माळगे उपिस्थत होते. कार्यक्रमाची सुरवात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून झाली . यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली . गणेश पाटील यांनी भविष्यामध्ये ही सैनिकी गावासाठी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला . भवानीसिंह घोरपडे यांनी कंपनीचे आभार मानून गरीब होतकरू साठी नेहमीच सामाजिक भावनेतून काम करणार असल्याची ग्वाही दिली . या वेळी प्रमुख पाहुण्यांचा सपत्नीक सत्कार सैनिक समाज कल्याण मंडळामार्फत करण्यात आला . यावेळी मान्यवरांच्या हस्ते सैनिक टाकळी व परिसरातील लाभार्थ्यांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले . स्वागत सैनिक समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऑ ले .बी एस पाटील यांनी केले त्यांनी मंडळाच्या विविध समाजोपयोगी कार्याचा आढावा घेतला आभार मंडळाचे सचिव ए वाय पाटील यांनी मानले .कार्यक्रमास टाकळी दत्तवाड व परिसरातील राजकिय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment