सरुड/प्रतिनिधी- अविनाश कोकणे
सरुड गावची अनेक वर्षांपासून शान वाढवणारा शाहूकालीन तलाव मागील पंचवार्षिक योजना दरम्यान स्वछतेच्या दृष्टिकोनातून फोडण्यात आला . गाळ काढल्यानंतर तलावाच्या स्वच्छतेसाठी काही उपाययोजना करायला हव्या होत्या. परंतु प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. तलावाच्या शेजारी अस्वच्छता पसरली आहे. काही वेळा नाल्याचे पाणी देखील तलावात जात होते.तलावाच्या कोपऱ्यामध्ये झुडपे वाढू लागली आहेत.प्लास्टिक तसेच समारंभात वापरल्या जाणाऱ्या पत्रावळ्या देखील तलावाच्या बाजूस फेकून दिल्या जातात.याकडे जाणीव पूर्वक लक्ष देऊन स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तलावाच्या बाजूने वृक्ष लागवड करून जगवायला हवीत तसेच स्वछतेसाठी उपायोजना करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तलावाचा विचार करणे श्रेयस्कर ठरेल.
अश्यावेळी प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावण्याची आवश्यकता आहे.
▼
No comments:
Post a Comment