Sunday, 4 March 2018

जोतिबा डोंगर येथे वनविभागाचा भोंगळ कारभार .

.जोतिबा (वाडीरत्नागिरी ) - आतिश लादे.

जोतिबा डोंगर परिसरात वृक्ष व दाट झाडी असल्याने हा परिसर हिरवाईने नटलेला व नेत्रसुखद आहे . सद्यस्थितीत या डोंगर भागात वृक्षांची संख्या घटताना पहावयास मिळत आहे.दिवसा देखील होणारी वृक्षतोड आणि तस्करी यामुळे अनेक वेगवेगळ्या जातीची झाडे नामशेष होत आहेत.सद्या हिरवीगार असणारी झाडे अचानक वाळलेली पहावयास मिळत आहेत. केमिकल औषधांचा वापर करून ती झाडे वाळवली जात आहेत असे पर्यटक व ग्रामस्थांचे मत आहे.यावर वनविभाग दुर्लक्ष करत असून डोंगर भागात अशी वृक्षतोडीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वनविभागाने याकडे लक्ष देऊन उर्वरित झाडे तरी सुरक्षित रहावीत व वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment