Sunday, 4 March 2018

कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत - सतेज पाटील

पेठवडगाव : प्रतिनिधी  दि. ४/३/१८
मिलींद बारवडे
  शिक्षण क्षेत्रातील निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी स्वतः अपडेट राहावे  व राष्ट्र घडविण्यासाठी शिक्षकांनी तयार राहावे असे  आवाहन माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले .
      स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने पेठवडगाव येथे आयोजित ' नवीन शैक्षणिक धोरण विचारमंथन ' व  शिक्षक समाजसेवक गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . अध्यक्षस्थानी कणेरीमठाचे प.पू.मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामिजी होते.माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती .
       यावेळी प.पू. मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामिजी म्हणाले की, समाजात वाढणाऱ्या गंभीर समस्या कमी करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे .शिक्षण हे ज्ञानाचे साधन असून शिक्षणामुळे जीवन अर्थपूर्ण बनते . राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये  शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे .     
       प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने  झाली .शिक्षण क्षेत्रात समाजकार्यात अग्रेसर राहून नेतृत्व करणाऱ्या शिक्षक व समाजसेवकांना या कार्यक्रमात शिक्षण महर्षी ,शिक्षणरत्न , शिक्षकरत्न,समाजभूषण, आदर्श ग्रंथपाल , आदर्श लिपीक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन एकूण ४६ जणांना गौरविण्यात आले .यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शिक्षक नेते एस.डी.लाड ,शिक्षक नेते दादासाहेब लाड , शिक्षणाधिकारी किरण लोहार ,सुभाष चौगले, प्रा. जयकुमार देसाई आदीं मान्यवरांची भाषणे झाली. बाळासाहेब डेळेकर, मोहन भोसले, राजाराम वरुटे, अभिजीत गायकवाड, व्ही.जी. पोवार, खंडेराव जगदाळे डी.एस. घुगरे, भास्कर चंदनशिवे, प्रविण देसाई,लक्ष्मण कांबरे, भाऊसाहेब सकट, फुलसिंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत राजेंद्र माने यांनी केले .प्रास्ताविक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी केले .आभार मिलिंद बारवडे यांनी मानले .
              फोटो
माजी राज्यमंत्री तथा आम. सतेज ऊर्फ बंटी पाटील शिक्षण महर्षी पुरस्कार सचिव प्रा. जयकुमार देसाई यांना प्रदान करतांना.शेजारी प.पू. मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामिजी , सुधाकर निर्मळे व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment