Friday, 9 March 2018

विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी व पराक्रमी बनून देशाप्रती कार्य करावे : सेवानिवृत्त आय.पी.एस. मीरा बोरवणकर यांचे प्रतिपादन.


पेठ वडगांव :

विद्यार्थ्यांनी महत्वाकांक्षी बनावे, आत्मविश्वास , धाडस व पराक्रम अंगीकारून देशाची सेवा
करावी, थोरांचा सन्मान राखावा, आपल्या जिद्द व चिकाटीने स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे, देशासाठी
कार्य करावे व या मातृभूमीच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहावे असा मौलिक उपदेश त्यांनी केला. डॉ.
सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल येथे शुक्रवार, दिनांक 09/03/2018 रोजी आयोजित व्याख्यानात त्या बोलत
होत्या.
आपल्या व्याख्यानात बोलतांना पुढे त्या म्हणाल्या की, युवतींनी व महिलांनी स्वतःकडे
सबलीकरणाच्या दृष्टीनेच पहावे, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. अंगी असलेल्या गुणांना
वाव देवून स्वतःला सिद्ध करून दाखवावे तसेच आत्मसन्मान, महिलांचा गौरव, गुन्हेगारी, पोलिस
सेवेतील अनुभव, विद्यार्थी जीवनातील अनुभव, महाविद्यालयीन जीवनाचे अनुभव, स्पर्धा परिक्षा,
अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रम या विषयावर विचार व्यक्त केले तसेच एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी.
परीक्षा तयारी संदर्भात माहिती देवून स्पर्धा परिक्षेतून नाव उज्ज्वल करण्याचा उपदेश दिला.
जिद्द आणि चिकाटीला मेहनतीची जोड दिल्यास यशाचे शिखर दूर राहत नाही असे सांगून
विद्यार्थी वर्गाला अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये भाग घेवून सर्वांगीण विकास
साधावा असे मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव यांनी तर
आभार प्रदर्शन श्री. प्रफुल्ल आडगळे यांनी मानले. सुत्रसंचालन श्री. मारूती कांबळे यांनी नी केले..
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिवा सौ.विद्या पोळ, संचालक  डॉ. सरदार जाधव, आर्मड फोर्सेस प्रिप्रेटरी इंन्स्टिटयुटचे संचालक श्री.विश्वास
कदम यांच्यासह सर्व षिक्षक, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment