कोल्हापूर - अमोल बी. ( पत्रकार)
मागच्या आठवड्यात कोल्हापूर शहरवासीयांना एक नवा अनुभव आला. पाटबंधारे विभागाच्या काही कर्तव्यदक्ष (?) अधिकार्यांनी को.म.न.पा. चे पाणी उपसा केंद्र सील केले. कारण होते मागील थकबाकी जमा न केलेमुळे त्यांनी ही कारवाई केली. खरेतर हा प्रश्न सामंजस्याने सोडवायला हवा होता, असे न करता आततायी पणाने ही कारवाई झाली. तसे पाहीले तर संबंधित यंत्रणेने शहरवासीयांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरले होते. आणि मग काय महानगरपालिकेने ही हम भी कुछ कम नहीं असे दाखवण्यासाठी पाटबंधारे विभागाला घरफाळा व पाणीपट्टी थकबाकीची नोटीस बजावली. वास्तविक असे लोकाभिमुख प्रश्न घाइगडबडीत न हाताळता सामंजस्याने सोडवायला हवेत. दोन्हीही शासनाच्या अखत्यारीतील विभाग त्यामुळे ताटात काय आणि वाटीत काय पण झळ बसली ती सामान्य माणसाला! जनमाणसांत स्थानिक प्रशासना बाबत दृढ करायचे असेल तर परस्परांनी अशा कागाळ्या पुन्हा करु नयेत .
No comments:
Post a Comment